अनेक महिला चेहऱ्यावरील केसांमुळे त्रस्त असतात. त्यासाठी बऱ्याच महिला चेहऱ्यावर शेव करतात. काहीजणांना ओठांजवळ किंवा कपाळावर केस येतात, यामुळे त्वचेचा रंग डार्क दिसू शकतो. हॉरमोनल चेंजेसमुळे चेहऱ्यावर केस येऊ शकतात. यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंटस केल्या जातात. पण या ट्रीटमेंटमुळे चेहऱ्याची त्वचा खराब होण्याची शक्यता असते. यापैकी काही ट्रीटमेंट्समुळे त्वचेवर सूज येऊ शकते. त्यामुळे अशा ट्रीटमेंट करणे टाळावे. तर काहीजण शेवचा पर्याय निवडला जातो. तर काहीजण चेहऱ्यावर शेव करण्याचा पर्याय निवडतात. डॉक्टर गीतिका मित्तल यांनी याबद्दल काय टिप्स दिल्या आहेत जाणून घ्या.

डॉक्टर गीतिका मित्तल यांनी चेहऱ्यावर शेव करण्याची टिप्स देणारी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्या दरवेळी चेहऱ्यावरील केस घालवण्यासाठी शेव करण्याचा सल्ला देतात. चेहऱ्यावर शेव करताना कोणत्या टिप्स लक्षात ठेवाव्या जाणून घ्या.

आणखी वाचा : लोखंड, स्टील, ॲल्युमिनियम की मातीची? तज्ञांच्या मते जेवण बनवण्यासाठी कोणती भांडी वापरावी जाणून घ्या

चेहऱ्यावर शेव करताना या टिप्स लक्षात ठेवा

  • तज्ञांच्या मते कधीही कोरड्या त्वचेवर शेव करू नका. शेव करायच्या आधी चेहरा धुवून घ्या आणि थोडा ओलसर असू द्या.
  • चेहऱ्याच्या ज्या भागावर शेव करायचे आहे तिथे शेविंग जेल किंवा क्रिमी क्लीनजर वापरा यामुळे त्वचा ड्राय होणार नाही आणि लेजरने सहजरित्या शेव करता येईल.
  • जर चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील किंवा त्वचेवर काही रिऍक्शन झाली असेल, तर त्यावर कधीच रेजर वापरू नये.
  • शेव केल्यानंतर आठवणीने त्या जागेवर बर्फाने शेका किंवा यासाठी अँटीबायोटिक क्रिम किंवा एलोवेरा जेलदेखील वापरू शकता.

Story img Loader