kapoor Cone: अनेकदा बाथरूम आणि टॉयलेटच्या दुर्गंधीमुळे लोक हैराण होतात. हिवाळ्याच्या दिवसात सतत ओलावा असल्यामुळे बाथरूम आणि टॉयलेटमधून दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत लोक वेगवेगळ्या प्रकारच्या एअर फ्रेशनरची मदत घेतात आणि हा दुर्गंध टाळण्याचा प्रयत्न करतात. पण, आज आम्ही तुम्हाला एक घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने बाथरूम आणि टॉयलेटमधून येणारी दुर्गंधी दूर होईल. तसेच या उपायातील अँटीबॅक्टेरियल आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म बॅक्टेरिया मारून वातावरण निरोगी ठेवण्यास मदत करतात.
बाथरूममधून दुर्गंधी दूर कशी करावी?
बाथरूमची दुर्गंधी दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त काही अँटीबॅक्टेरियल गोष्टी वापराव्या लागतील. जसे कापूर, तुरटी आणि नॅप्थालिनच्या गोळ्या. त्यामुळे तुम्हाला फक्त कापूर कोन बनवून बाथरूममध्ये लावावे लागेल.
हेही वाचा: रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
घरी कापूर कोन कसा बनवायचा?
- कापूर कोन बनवणे खूप सोपे आहे, त्यासाठी तुम्ही फक्त एक सुती कापड किंवा रुमाल घ्या.
- आता त्यात कापूर भरा आणि त्याचा कोन बांधा.
- या कोनात तुम्हाला हवे असल्यास थोडी लवंग आणि तुरटीही टाकू शकता.
- हे तयार कापूर कोन दुर्गंधी येत असलेल्या ठिकाणी लटकवा.
कापूर दुर्गंधी कशी दूर करतो?
कापूर हे नैसर्गिक फ्रेशनर आहे. दुर्गंधी दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. खरंतर कापूर जेव्हा हवेच्या संपर्कात येतो तेव्हा तो हळूहळू विरघळू लागतो आणि त्याचा सुगंध हवेत पसरतो. यानंतर कापूर प्रभावी कीटकनाशक म्हणून काम करतो. मुंग्या, ढेकूण आणि डास यांसारख्या कीटकांपासून मुक्त होण्यासदेखील हे उपयुक्त आहे. तसेच ते वातावरणात बराच काळ राहते, ज्यामुळे हवा ताजी वाटते. त्यामुळे तुम्ही या टिप्सचा अवलंब करून कापूर कोन बनवून घरीच वापरू शकता.