वाढत्या वयानुसार केसं पांढरे होणे देखील सामान्य आहे. काहीवेळा लोकांचे केसं लहान वयातच पांढरे होऊ लागतात. तसेच कोणालाच आपले केसं पांढरे झालेले आवडत नाहीत, कारण यामुळे अर्थातच लुक खराब होतो. अशा परिस्थितीत केसं काळे करण्यासाठी त्यांना कलर करावे लागतात. तर काही लोकं शाम्पूपासून साबणापर्यंत सर्व नैसर्गिक उत्पादनाचा वापर करतात. तुम्हालाही नैसर्गिक पद्धतीने पांढरी केसं काळे करायचे असतील तर हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा.
केस काळे करण्यासाठी सर्वात प्रभावी स्वयंपाकघरातील चहाची पावडर हा पदार्थ आहे. चहा पावडरचा तुम्ही हेअर डाय म्हणून वापर करू शकता. चहा पावडरच्या मदतीनं तुमच्या पांढऱ्या केसांना नैसर्गिकरित्या काळा रंग मिळेल. चहा पावडरमध्ये टॅनिन अॅसिड असतं, या गुणधर्मामुळे पांढरे केस काळे होतात. चला जाणून घेऊया चहाच्या पावडरने केस कसे काळे करावे.
अशा पद्धतीने चहा पावडरच्या मदतीने केस करा काळे
पांढरे केसं काळे करण्यासाठी चहाची पावडर गरम पाण्यात उकळा. तुम्ही सुमारे ७ चहाच्या पिशव्या किंवा ५-६ चमचे चहाची पाने(चहा पावडर) घेऊ शकता. चहाची पावडर किमान एक कप पाण्यात उकळा. आता ते डोक्याला लावा आणि ३५-४० मिनिटे ठेवल्यानंतर कोमट पाण्याने केस चांगले धुवा. तुम्हाला तुमच्या केसांवर काळा रंग दिसून येईल.
तुम्हाला जर आणखीन गडद कला रंग केसांना हवा असेल तर, चहाचा प्रभाव आणखी थोडा वाढवण्यासाठी, २ चमचे चहाच्या पावडरमध्ये ३ चमचे कॉफी घाला आणि त्यांना एक कप पाण्यात सुमारे १५ मिनिटे उकळवा. अर्धा तास केसांवर ठेवल्यानंतर डोके धुवा. हे तुमच्या केसांना गडद काळा रंग देईल.
लक्षात ठेवा की चहाची पाने लावल्यानंतर लगेच केसांवर शॅम्पू वापरू नका, कारण त्यामुळे केसांना योग्य रंग येणार नाही.
(टीप: वरील टिप्सचा वापर करताना क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घ्या.)