दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये मऊ मुलायम आणि अतिशय हलकी अशी इडली सर्वांच्याच आवडीची असते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर एकदम झटपट मिळणाऱ्या इडलीला बरेचजण घरी नाश्त्यासाठी किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी बनवतात. काहीही झालं तरी घरी बनवलेली इडली ही बाहेरपेक्षा थोडी जास्त हलकी होऊन खायला मस्त लागते. पण, इडली बनवायला जास्त कष्ट नसले तरीही त्याची भांडी स्वच्छ करणं म्हणजे एक दुप्पट काम असतं. इडली पात्रात टाकलेलं पीठ, त्या भांड्यांना लावलेलं तेल या सगळ्या गोष्टींमुळे इडली पात्र सहज साफ करता येत नाही. पण, आता तुमच्या स्वयंपाकघरातील ही समस्याच दूर करण्यासाठी या खास टिप्स मदत करतील.

इडली पात्र साफ करण्याच्या पाच टिप्स

१. गरम पाण्याने भांडे साफ करा.

इडली पात्राला चिकटून राहिलेले इडली पीठ जर तुम्ही गार पाण्याने काढत असाल तर त्याचा फारसा उपयोग होणार नाही. कारण गार पाणी वापरल्याने चिकटलेले पदार्थ कडक होऊ शकतात. तेलाचा अंश राहिल्यास तो देखील पटकन निघत नाही. अशात तुम्ही गार पाण्याऐवजी कोमट किंवा गरम पाण्याचा वापर करायला हवा. यामुळे भांड्याला चिकटलेले पीठ आणि तेलाचा अंश सहज साफ करता येतो. त्यामुळे घरी इडली बनवल्यानंतर इडलीची भांडी लगेच गरम पाण्यानी धुवून घ्या.

bhakri
भाकरी थापताना नेहमी मोडते, भाजताना चिरते का? टेन्शन घेऊ नका; टम्म फुगलेली मऊसूत ज्वारीची भाकरी बनवा, फक्त या सोप्या टिप्स वापरून पाहा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
how to get rid of shoe smell instantly
तुमच्या शूजमधून येणारी दुर्गंधी काही मिनिटांत होईल गायब, फॉलो करा फक्त ‘या’ ५ सोप्या टिप्स
How to make paratha
प्रत्येक वेळी पराठे लाटताना फुटतात? मग ट्राय करून बघा ‘या’ टिप्स…
way of chopping and cleaning methi leaves
मेथीची भाजी खायला आवडते; पण साफ करायचा कंटाळा येतो? मग ‘या’ सोप्या टिप्सच्या मदतीने भाजी चुटकीसरशी करा साफ
These simple tips will help to make a delicious food
जेवण बनवताना खूप धावपळ होते? ‘या’ सोप्या टिप्स रूचकर जेवण बनवण्यासाठी करतील मदत
How to send WhatsApp messages without save a number know 5 easy methods
मोबाइल नंबर सेव्ह न करता WhatsApp मेसेज कसा पाठवायचा? जाणून घ्या पाच सोप्या पद्धती…
How Much Water Should Pregnant Women Drink? Heres What Expert Says know more details
गर्भवती महिलांनी रोज किती पाणी प्यावे? वाचा एकदा, तज्ज्ञांनी सांगितलेली माहिती…

२. लिक्विड साबणाचा वापर करा

इडली पात्राला चिकटलेले पीठ काढण्यासाठी भांडी हलक्या हाताने घासायला हवी, नाही तर भांड्यांना चरे पडून भांडी खराब होऊ शकतात. म्हणून इडली बनवल्यानंतर इडली पात्र व इतर भांडी, गरम पाणी आणि लिक्विड साबण घातलेल्या मोठ्या टबात १५ ते २० मिनिटांसाठी भिजवून ठेवा आणि नंतर साफ करा. हलक्या हाताने भांडी घासण्यासाठी तुम्ही भांडी घासायच्या स्पंजचा वापर करू शकता.

हेही वाचा : अरे देवा, रात्रभर पार्टी अन् घरभर पसारा? झटपट घर आणि स्वयंपाकघर आवरण्याच्या या पाच टिप्स पाहा….

३. व्हिनेगरचा वापर

व्हिनेगरनेदेखील तुम्ही इडली पात्र स्वच्छ करू शकता. स्वयंपाकघरातील चिवट डाग काढण्यासाठी व्हिनेगर एखाद्या जादूप्रमाणे काम करतो. तुम्ही भांडी चमकावण्यासाठी, व्हिनेगरचे क्लिनर बनवू शकता. यासाठी एक भाग व्हिनेगरमध्ये दोन भाग पाणी मिसळून त्यामध्ये काही वेळासाठी इडली पात्र बुुडवून ठेवून नंतर ती भांडी पाण्याखाली धुवून घ्या. यामुळे भांडी अतिशय झटपट साफ होतात.

४. बेकिंग सोडा

आपण बरेचदा स्वयंपाकघरातील वस्तू स्वच्छ करण्यासाठी, ओटा किंवा शेगडीवरील चिकट, चिवट डाग काढण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करत असतो. पण, या सोड्याचा वापर करून तुम्ही इडली पात्रदेखील अगदी चकचकीत करू शकता. यासाठी इडलीच्या भांड्यांवर थेट बेकिंग सोडा न टाकता, एक ते दोन चमचे बेकिंग सोडा एका मोठ्या बादलीत टाकून ढवळून घ्या. काही वेळासाठी इडलीची सर्व भांडी त्यामध्ये भिजवून ठेवा. नंतर भांडी घासायच्या मऊ स्पंजच्या मदतीने आरामात ही भांडी घासून घ्या. यामुळे भांडी पटापट स्वच्छ होतील आणि त्यांना चमक येऊन ती नव्यासारखी दिसतील.

५. लिंबू पाण्याचा वापर

लिंबू हा स्वयंपाकघरात अगदी हमखास मिळणारा असा पदार्थ आहे. याच्या ॲसिडिक आणि जंतुनाशक गुणधर्मांमुळे याचा वापर आपण बरेचदा वस्तू स्वच्छ करण्यासाठी करतो. या लिंबाच्या मदतीने इडली पात्र कसे साफ करायचे पाहूया. एक किंवा दोन लिंबांचा रस गरम पाण्याने भरलेल्या एका मोठ्या बादलीत काढून घ्या. आता त्यामध्ये इडली पात्र भिजवून ठेवून, काही वेळानंतर हलक्या हाताने घासून घ्या आणि भांडी पाण्याखाली स्वच्छ करून घ्या.

या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही इडली पात्र किंवा कोणतीही चिवट भांडी अगदी सहजतेने स्वच्छ करून त्यांना चमकदार ठेऊ शकता.

Story img Loader