Holi 2022: होळीचा सण येण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. लोकांमध्ये आतापासूनच या उत्सवाबद्दल उत्साह दिसून येत आहे. होळीच्या दिवशी सर्वजण आपापल्या घरातून बाहेर पडतात आणि आपापल्या मित्र, नातेवाईक आणि कुटुंबियांसोबत होळी खेळतात. आता प्रत्येकाकडे स्मार्टफोन आहे. स्मार्टफोनशिवाय घराबाहेर पडणे आजच्या काळात शक्य नाही. त्यातच होळीच्या दिवशी आपला मोबाईल फोन आणि गॅजेट्स सुरक्षित ठेवणे हे मोठे आव्हान बनले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या सर्वांना माहित आहे की कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये पाणी किंवा रंग गेला तर ते खराब होते. अशावेळी, जर तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या मोबाईल स्मार्टफोनला होळीचे रंग आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया त्या टिप्सबद्दल.

Holi 2022: होळीच्या रंगांपासून असा करा आपल्या नाजूक डोळ्यांचा बचाव; होणार नाही कोणताही त्रास

या टिप्सचा वापर करून तुमचा मोबाईल फोन आणि गॅजेट्स होळीच्या रंगांपासून सुरक्षित ठेवा

  • होळी खेळताना आपल्या फोन, इअरफोन आणि इतर गॅजेट्सना रंग लागणे ही एक सामान्य समस्या आहे. यामुळे, ते कधीकधी खराब देखील होतात. अशा परिस्थितीत होळीच्या रंगापासून गॅजेट्सचे संरक्षण करण्यासाठी त्यावर ग्लिसरीन किंवा मॉइश्चरायझर लावावे. त्यामुळे आपण आपल्या गॅजेट्सवरून सहजपणे रंग पुसून काढू शकतो.
  • आपल्या स्मार्टफोनचा होळीच्या रंगांपासून बचाव करण्यासाठी तुम्ही तो एअरप्रूफ झिपलॉक बॅगमध्ये ठेवू शकता. यामुळे तुमचा फोन पाणी आणि रंगांपासून सुरक्षित राहील.
  • स्मार्टफोनचे स्पिकर्स सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही ते चिकटपट्टीने बंद करून ठेवा. यामुळे स्पिकर्स आणि चार्जिंग पोर्ट पाणी आणि रंगांपासून सुरक्षित राहील.
  • जेव्हा तुम्ही फोन एअर-प्रूफ झिपलॉक बॅग किंवा वॉटरप्रूफ बॅगमध्ये ठेवता तेव्हा तो सायलेंट मोडमध्ये ठेवा. फोन सायलेंट मोडवर ठेवल्याने तुम्ही मोबाईल फोनचे स्पीकर पाणी आणि रंगापासून सुरक्षित ठेवू शकता.

Video : इच्छेविरुद्ध वेश्या व्यवसायात अडकलेल्या मुलींना आधार देणाऱ्या त्रिवेणी आचार्य । गोष्ट असामान्यांची: भाग १९

  • आजकाल बहुतेक लोक मोबाईल फोनमध्ये बायोमेट्रिक लॉक ठेवतात. अशा परिस्थितीत झिपलॉक बॅगच्या आतला मोबाईल उघडणे कठीण होते. अशा परिस्थितीत, बायोमेट्रिक लॉकऐवजी, तुम्ही पिन किंवा पॅटर्न लॉकचा पर्याय निवडू शकता. याच्या मदतीने तुम्ही फोन सहज उघडू आणि ऑपरेट करू शकाल.
  • होळीच्या दिवशी, स्मार्टवॉच घालणे टाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला ते घालायचे असेल तर ते वॉटर प्रूफ असावे. जर ते वॉटरप्रूफ नसेल, तर प्लास्टिकच्या पिशवीने झाकून ठेवा, जेणेकरून त्यावर रंग आणि पाणी पडल्यास ते खराब होणार नाही.
  • अनेकांना असे वाटते की पाणी पडल्याने मोबाईल फोन किंवा गॅझेट खराब झाले तर ते गॅरेंटी पिरियडमध्ये बदलू शकतात. पण, असा विचार करणे पूर्णपणे चुकीचे आहे. पाण्यामुळे गॅझेट खराब झाल्यास कंपनी गॅरेंटी कव्हर करत नाही. त्यामुळे आपल्या उपकरणांची काळजी स्वतः घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला नंतर खूप पश्चाताप होऊ शकतो.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use this tips to protect your gadgets from holi colors and water pvp
Show comments