घडय़ाळ म्हणजे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कितीही नाही म्हटलं तरी आपलं आयुष्य त्या टिकटिकवरच चालतं. आता या घड्याळांचा लुक पूर्वीसारखा न राहता गेल्या काही वर्षात नव्याने बाजारात दाखल झालेला आहे. वेगेवगळ्या पद्धतीच्या डिझाईनमुळेच घड्याळ ट्रेण्डमध्ये आली आहेत. स्मार्ट फोन्स आल्यावर काही प्रमाणात का होईना हातावरची घडय़ाळं काही काळ मागे पडली होती, परंतु आता त्यांनी दमदार कमबॅक केलं आहे. फक्त वेळ सांगण्यापूर्ती ही घड्याळ आता राहिलेली नाहीत. आता ही घड्याळ एक स्टेटमेंट ज्वेलरी म्हणून आवर्जून महिला व पुरुषही घालत आहेत. गेल्या दोन ते तीन वर्षांत वेगवेगळ्या पद्धतीच्या घडय़ाळांचा प्रचंड बोलबाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ट्रेण्डींग घड्याळ

१. कॅसिओ व्हिंटेज सिल्वर वूमन वॉच

ही चांदी सारखा सिल्वर रंग असलेली घड्याळ तुम्ही कोणत्याही कपड्यांवर घालू शकता. हे घड्याळ डायल स्टेनलेस-स्टील बँडसह चौरस आकाराच आहे. तसेच ह्या घड्याळांवर पाणी पडल्यास त्याला काहीही होत नाही.

२. फॉसील जेस रोझ गोल्ड वूमन वॉच

हे गोल डायलसह रोझ गोल्ड टोन्ड घड्याळ आहे. डायल आणि बँड दोन्ही चमकदार स्टोन आणि धातूच्या पट्टायासह सुशोभित केलेले आहेत.

३. फास्ट्रॅक ट्रेंडीज वूमन वॉच

गोलाकार डायलसह गडद रंगछटांमध्ये हे मॅट-टोन्ड घड्याळ आहे. हे वजनाने हलके घड्याळ आहे. त्यामुळे तुम्ही सहज रोजच्या वापरासाठी हे घड्याळ वापरू शकता.

४. सोनाटा पंख वूमन वॉच

हे घड्याळ स्टेनलेस-स्टील बँडसह येते. हे घड्याळ गोल डायलमध्ये आहे. या डायलवर फुलांची प्रिंट आहे.

५. अ‍ॅनालॉग घडय़ाळ

हा घडय़ाळांचा सर्वात पारंपरिक अर्थात जुना प्रकार आहे. हा प्रकार एवढा कॉमन आहे की बहुधा आपण आपल्या घरात, आपल्या शाळेत आणि जवळजवळ सगळ्याच ठिकाणी जाताना या घडय़ाळांना पसंती देतो. टिपिकल सिल्वर आणि गोल्ड रंगाचा स्टील किंवा लोखंडी धातूचा बेल्ट याला असतो. याचे डायल गोल आणि मोठे असते. आता हे बेसिक फीचर तसेच ठेवून ही घडय़ाळं पुन्हा बाजारात आली आहेत.