करोना महामारीमध्ये संसर्गाच्या भीतीने कोणालाही घराबाहेर पडणे शक्य नव्हते. तेव्हाच ‘वर्क फ्रॉम होम’ म्हणजेच घरून काम करण्याचा पर्याय उपलब्ध झाला. आता जरी सर्वकाही पुर्ववत झाले असले, तरी अजुनही काही ठिकाणी ‘वर्क फ्रॉम होम’ हा पर्याय उपलब्ध आहे. ‘वर्क फॉर्म होम’ करताना कामावर लक्ष केंद्रित करणे कधी कधी कठीण होते. यामागचे एक मुख्य कारण म्हणजे मुलं. घरात जर लहान मुलं असतील तर कामावर लक्ष केंद्रित करणे कधी कधी कठीण होते. यासाठी काय उपाय करता येतील जाणून घेऊया.
लहान मुलांना इतरांचं लक्ष सतत त्यांच्यावरच असावं असं वाटत असतं. त्यामुळे त्यांच्यासोबत असताना कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. अशावेळी काही युक्त्या करुन मुलांना व्यस्त ठेवता येऊ शकते. जाणून घेऊया कशाप्रकारे मुलांना व्यस्त ठेवता येऊ शकते.
आणखी वाचा – मीटिंग, लेक्चर मध्ये सतत येतेय जांभई? ‘हे’ उपाय चटकन देतील आराम
खेळण्यांची स्वच्छता
हा मुलांना व्यस्त ठेवण्यासाठीचा सोपा पर्याय आहे. ५ वर्षांवरील मुलांना त्यांची सर्व खेळणी धुण्यास तुम्ही सांगू शकता. साबणाच्या पाण्याने बादली भरून त्यात सर्व खेळणी धुण्यास सांगू शकता. यामुळे मुलं व्यस्त राहतील आणि यामधून ते स्वच्छता राखायला शिकतील. सगळ्याच लहान मुलांना पाण्यासोबत खेळायला आवडते, त्यामुळे या उपक्रमाचा ते नक्की आनंद घेतील.
हस्तकला आणि चित्रकला
हस्तकला आणि चित्रकला हा लहान मुलांचा आवडता विषय आहे. त्यामुळे थोड्या वेळासाठी जर तुम्हाला एखाद्या महत्वाच्या मिटिंगला उपस्थित राहायचे असेल आणि मुलांकडे लक्ष देणे शक्य नसेल तर हा पर्याय तुमची कोंडी दूर करेल. तुम्ही मुलांना चित्रकलेची पुस्तक, रंग, चिकणमाती, हस्तकलेसाठी काही कागद अशा वस्तू देऊ शकता. त्यांना त्यांच्या इच्छिने काहीही तयार करायला सांगा. या उपक्रमामुळे त्यांच्यातील सर्जनशीलता आणि कल्पनाशक्तीला चालना मिळेल.
Health Tips : ‘या’ गोष्टी खाल्ल्यावर येऊ शकतो राग; तापट माणसांनी अजिबात करू नये सेवन
व्यायाम आणि योगा
मुलांच्या वयानुसार तुम्ही त्यांना व्यायाम आणि योगा करण्यास देखील शिकवू शकता. व्यायाम आणि योगाचे मार्गदर्शक व्हिडीओ देखील त्यांना दाखवू शकता. यामुळे ते फिट राहतील आणि त्यांची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. मुलं स्वतःच्या शरीराचे नुकसान करणार नाहीत अशा सोप्या व्यायामाच्या, योगाच्या पद्धती त्यांना शिकवता येतील.
हे उपाय वापरून तुम्हाला काही वेळासाठी कामावर लक्ष केंद्रित करण्यास नक्की मदत होईल.