turmeric for tan removal: कडक ऊन आणि उष्णतेमुळे लोकांच्या त्वचेसंबधीत समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. टॅनिंग, पिगमेंटेशन आणि मृत त्वचा या समस्यांमुळे लोक त्रस्त होतात. अशा स्थितीमध्ये जर हळद वापरू शकतात. हळद त्वचेवर स्क्रबर सारखे काम करते. विशेष म्हणजे ही त्वचेमधील मृत त्वचा साफ करते. पण उजळ त्वचा मिळवण्यासाठी टॅनिंग हटवण्यासाठी कशी मदत करू शकते. चला जाणून घेऊ या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टॅन काढण्यासाठी वापरा हळद

टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही हळद बारीक करून त्यात कच्चे दूध घालून लावू शकता. यासाठी तुम्हाला फक्त कच्ची हळद बारीक करून त्यात कच्चे दूध घालावे लागेल. ही पेस्ट घट्ट करण्यासाठी त्यात एलोवेरा जेल घाला. सर्वकाही मिसळा आणि नंतर थोडा रवा किंवा तांदूळ पीठ घाला आणि ते टॅन केलेल्या भागावर लावा. २० मिनिटे तसेच राहू द्या आणि नंतर स्क्रब करा. यानंतर त्वचेला पाण्याने धुवा.

हेही वाचा – “पुन्हा बालपण जगणारी आजी!” नातवंडाबरोबर खेळतेय लगोरी, Viral Video पाहून तुमच्या चेहऱ्यावर येईल हसू

टॅन काढण्यासाठी हळदी उपयूक्त

कच्ची हळद टॅनिंगमध्ये खूप फायदेशीर आहे. कच्ची हळद देखील त्वचेचा टोन एकसमान होण्यास मदत करते आणि त्याचा अर्क मुरुमांचे लक्षणे कमी करण्यास देखील मदत करू शकतो. याशिवाय पिगमेंटेशन कमी होण्यास मदत होते. वास्तविक, हळदीचे कर्क्यूमिन हे एक संयुग आहे जे टॅनिंगमध्ये खूप प्रभावीपणे काम करते.

हेही वाचा – चहामध्ये तूप टाकून प्यावे का? आतड्यांच्या आरोग्यासाठी हे फायदेशीर आहे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर….

एवढेच नाही तर कच्च्या हळदीमध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म देखील भरपूर असतो ज्यामुळे त्वचा आतून स्वच्छ होते आणि त्वचा खुलते. हे मृत पेशी काढून टाकते आणि त्वचेमध्ये घाण जमा होण्यापासून प्रतिबंधित करते. एवढेच नाही तर हे कोलेजन बूस्टर देखील आहे जे त्वचेचा रंग सुधारतो आणि त्वचेचा पोत सुधारतो. त्यामुळे तुमच्या मानेवर टॅनिंग होत असेल किंवा हात-पायांवर टॅनिंग होत असेल, तुम्ही हा उपाय करून पहा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use turmeric like this to remove tanning on hands neck and feet skin care tips snk
Show comments