Monsoon Food Care Tips: पावसाळा आला की हवेमध्ये आद्रता वाढते. त्यामुळे किचनमधील वस्तू खराब होण्याची शक्यता वाढते. विशेषत: रोज वापरत असलेली साखर आणि मीठ. होय मान्सूनच्या वातावरणात वाढणाऱ्या आद्रतेमुळे मीठ आणि साखरेमध्येही ओलावा येतो ज्यामुळे ते बाजारातून आणल्यासारखे राहत नाही. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टीप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही मीठ आणि साखर अगदी फ्रेश ठेवू शकता. चला जाणून घेऊ या.
काचेच्या बरणीत ठेवा मीठ आणि साखर
पावसाळ्यामध्ये विशेषत: साखर आणि मीठ हे काचेच्या बरणीतमध्ये ठेवा. एवढेच नाही तर जेव्हा साखर आणि मीठ वापरला तेव्हा कोरडा चमचा वापरा. ओल्या चमचा वारपल्यामुळे त्यात ओलावा वाढू शकतो.
हेही वाचा – १०० रुपये किलो झाला टोमॅटोचा भाव, काळजी करू नका! ‘या’ सोप्या टिप्स वापरून घरीच उगवा टोमॅटोचं रोप
तांदूळ
ज्या बरणीत तुम्ही साखर आणि मीठ ठेवायचे आहे त्यामध्ये सुरुवातीला काही तांदूळ टाका. त्यानंतर त्यामध्ये मीठ किंवा साखर भरावी. असे केल्याने बरणीमध्ये असलेली जास्तीचा ओलावा दूर होईल आणि बरणी पूर्ण पणे कोरडी आणि सुरक्षित राहील.
पावसात भिजल्यानंतर केस चिकट झालेत? मग, ३ टिप्स वापरून पाहा, फंगल-बॅक्टेरियापासून राहा दूर
लवंग
पावसाळ्यात साखरेत ओलावा येऊ नये साठी तुम्ही सारखेच्या बरणीत ५-६ लवंग कपड्यामध्ये बांधून टाकू शकता. त्यानंतर त्यावर साखर भरा. त्यामुळे साखरेच्या डब्यातील ओलावा येणार नाही आणि साखर सुरक्षित राहील.