एखाद्या कर्मचाऱयाने सलग मोठी रजा घेतल्यास त्याच्यामध्ये चालू नोकरी सोडून दुसरी शोधण्याची प्रबळ इच्छा निर्माण होते… अमेरिकेत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही गमतीशीर माहिती पुढे आलीये. 
सध्याच्या जमान्यात नोकरीमध्ये सातत्याने बदल करण्याची पद्धतच पडलीये. अमेरिकेसह इतर देशांमध्ये अनेक कर्मचारी सातत्याने आपली नोकरी बदलत असतात. नोकरी बदलण्याची इच्छा त्यांच्यामध्ये कधी निर्माण होते, याचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले.
मोठी रजा घेऊन कामावर परत आल्यावर सुमारे ७० टक्के कर्मचारी दुसरी नोकरी शोधण्यास सुरुवात करण्याची शक्यता असते, असे या सर्वेक्षणात आढळले. सर्वेक्षणामध्ये ऑनलाईन पद्धतीने नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱया १२०० हून अधिक जणांची माहिती जमविण्यात आली. त्यातून रजेच्या काळात कर्मचारी नोकरी बदलण्याबद्दल विचार करू लागतात, असे आढळले.
रजेच्या काळात रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मोकळा वेळ मिळत असल्यामुळे कर्मचारी आत्मपरीक्षण करतात. यावेळी संबंधित व्यक्तीची मनस्थिती एकदम निवांत असल्यामुळे ती पुढील नियोजन करू लागते. त्यामुळेच या काळात नोकरी बदलण्याचा विचार मनात येऊ शकतो, असे मॉन्स्टर डॉट कॉमच्या करिअर सल्लागार मेरी एलेन स्लेटर यांनी सांगितले.

Story img Loader