वजन कमी करण्यासाठी कॅलरीचे सेवन नियंत्रित करणे खूप महत्वाचे आहे. या प्रक्रियेत पचनशक्ती देखील तितकीच महत्वाची आहे. जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर पचनशक्ती चांगली असावी लागते. एखाद्या व्यक्तीची पचनशक्ती दिवसभरात किती कॅलरी बर्न करते, यावर सर्व अवलंबून असते.
पचनशक्ती ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये अन्नातील उर्जा कॅलरीमध्ये रूपांतरित होते आणि शरीराच्या इतर पेशी बनविण्यास मदत होते. जर आपली पचनशक्ती प्रक्रिया मंद असेल तर मधुमेह होण्याची शक्यता आणि रक्तदाब देखील वाढतो. जर आपल्या पचनशक्तीचा दर चांगला असेल तर आपले वजन वेगाने कमी करू शकतो. यासाठी आपल्याला पचनशक्ती वाढविणे आवश्यक आहे. पचनशक्ती कशी वाढवायची हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ दीक्षा भावसार काही नैसर्गिक उपाय सुचवतात जे आपली पाचन प्रणाली सुधारण्यास मदत करू शकतात.
१. वज्रासनानंतर जेवण: वज्रासनानंतर जेवण केल्यानंतर पोटात रक्त परिसंचरण सुधारते आणि पचन आणि शोषण सुलभ होते.
२. दुपारच्या जेवणानंतर दही किंवा ताक प्यायची सवय लावा. जर तुम्हाला ही सवय असेल तर ही खूप चांगली सवय आहे. तुम्ही अगदी आवर्जुन तुमच्या जेवणात ताकाचा समावेश करा. ताकात जर तुम्हाला पुदीन्याची पाने टाकता आली तर फारच उत्तम.
दुपारी जेवायचे आहे म्हणून खूप जेवू नका. पोटात थोडी जागा कायम रिकामी असून द्या. जर तुम्ही अशा पद्धतीने जेवण केले तर तुम्हाला निरोगी आरोग्य मिळेल. मग आता दुपारच्या आहारात काहीही खाण्यापेक्षा आवश्यक असलेल्या पदार्थांचा समावेश करा. हे पचन सुधारते कफ आणि वात कमी करते.
३. विसंगत पदार्थ टाळा. आयुर्वेदानुसार काही पदार्थ एकत्र खाऊ नयेत. त्यांना विरूद्ध आहार म्हणतात. फळे आणि दूध, मासे आणि दूध, मध आणि गरम पाणी, थंड आणि गरम पदार्थ एकत्र, असे काही खाद्यपदार्थ एकत्र खालल्यास तुमचे चयापचय बिघडवू शकतात. म्हणून, ते टाळणे तुमच्या हिताचे आहे.
४. शेंगदाणे भिजवा. शेंगा आणि शेंगदाण्यांमध्ये फायटिक अॅसिड असते. त्यामुळे आपल्या आतड्यांना त्यांच्यापासून पोषकद्रव्ये शोषणे कठीण होते. त्यांना भिजवून फायटिक अॅसिड काढून टाकलं जातं आणि आपल्या आतड्यांसाठी अन्न पचविणे आणि उपलब्ध पोषकद्रव्ये शोषून घेण्यास मदत होते.
५. कच्च्या भाज्या टाळा: डॉ. भावसार म्हणतात की, कच्चे अन्न चांगले चयापचय करण्यासाठी आधी आतड्यांचे आरोग्य चांगले असणे आवश्यक आहे. जेव्हा तुमची आतड्यांमधील अग्नी आधीच कमकुवत असते, तेव्हा कच्चे अन्न हव्या तितक्या प्रमाणात पचले जात नाहीत. तुम्हाला पोट फुगलेले आणि अस्वस्थ वाटू लागतं. म्हणून नेहमी शिजवलेले अन्न खा.
६. दररोज 5000 पावले चालत जा. जर तुम्ही शरीराची हालचाल केली नाही तर तुमची पचनशक्ती सुधारणार नाही. जर तुम्ही व्यायामात खूप व्यस्त असाल तर किमान 5000 पावले चालल्याने तुम्हाला तुमची पचन सुधारण्यास मदत करेल.