Valentine Day 2024 फेब्रुवारी महिन्याला प्रेमाचा महिना म्हणतात. या महिन्यात लोक आपल्या क्रश, पार्टनर किंवा जवळच्या व्यक्तींसमोर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी आतुर असतात. तसं पाहिलं तर हा आठवडा या जोडप्यासाठी एखाद्या सणापेक्षा कमी नाही. मुळात व्हॅलेंटाईन दिवस हा केवळ दोन जोडप्यांचा दिवस नसतो तर प्रेमाचा दिवस असतो. हे प्रेम फक्त पार्टनरपर्यंत मर्यादीत नसून इतर गोष्टींना, व्यक्तींना लागू होतं. त्यामुळे सिंगल लोकांना व्हलेंटाईन दिवस साजरा करण्याचे बरेच ऑप्शन्स असतात. आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्ही देखील अशाच लोकांपैकी एक आहात का? ज्यांना अद्याप आपला मनासारखा आणि इच्छित असा जोडीदार मिळालेला नाहीये. तुम्ही सिंगल लाईफ एन्जॉय करत असाल आणि योग्य जोडीदाराच्या शोधात असाल तर तुम्हीही व्हॅलेंटाईन डे साजरा करु शकता… फक्त थोड्या वेगळ्या मार्गांनी… तुम्हाला उदास वाटून घेण्याचं काहीच कारण नाहीये. चला तर मग… हे मार्ग कोणते आहेत, ते आपण जाणून घेणार आहोत…

माणसाने स्वत:वर आधी प्रेम करावं, असं म्हटले जाते. जर तुम्ही सिंगल आहात तर तुम्ही तुमच्या प्रती प्रेम व्यक्ती करू शकता. स्वत:साठी क्वालिटी टाईम काढू शकता.

मुळात व्हॅलेंटाईन डे हा प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी जितकं जास्त तुम्ही प्रेम व्यक्त कराल किंवा प्रेम वाटाल, शेअर कराल, तितकं तुमच्या आयुष्यात प्रेम भरभरुन येईल.

आई-वडिलांसोबत मंदिरात जा

व्हॅलेंटाईन डेला एकटे वाटून घेऊ नका. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदोत्सव साजरा करू शकता. या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवा. त्यांना सहलीला घेऊन जा. तुमच्या पालकांना तुमच्या प्रेमाचे महत्त्व सांगा, तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता ते त्यांना सांगा. तुम्ही तुमच्या कुटुंबासह मंदिरात जाऊ शकता. संध्याकाळी, तुम्ही तुमच्या कुटुंबासह बाहेर कुठेतरी डिनर करण्यासाठी किंवा बागेत बसू शकता.

सिंगल मित्रांसोबत पार्टी करा

तुम्ही तुमच्या सिंगल मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता. पण या व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने तुमचा मित्र त्याच्या मैत्रिणीसोबत बिझी असू शकतो किंवा तुमची मैत्रीण तिच्या बॉयफ्रेंडमध्ये बिझी असू शकते. त्यांना पाहून एकटे वाटून घेऊ नका. या दिवशी तुमच्या सर्व सिंगल मित्रांना एकत्र करा आणि घरी एकत्र जेवण करा. किंवा कुठेतरी बाहेर जाऊ शकता किंवा पार्टी करू शकता.

हेही वाचा >> Valentine’s Day Gifts: प्रियजनांना व्हॅलेंटाईन डे निमित्त बजेट गिफ्टनिंग ऑप्शन हवेत? बघा यादी!

सोलो प्रवास

जर तुम्हालाही प्रवासाची आवड असेल, तर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने एकटो सहलीला जाऊ शकता. आपण इच्छित असल्यास, आपण कुटुंब किंवा मित्रांसह हिल स्टेशन किंवा जवळच्या पर्यटन स्थळावर सहलीची योजना करू शकता. शहरापासून दोन-तीन दिवसांचा छोटा प्रवास तुमचा मूड फ्रेश करु शकतो.