Valentine Day 2024 All Date List : फेब्रुवारी महिना सुरू होताना वेध लागतात ते व्हॅलेंटाईन वीकचे. प्रेम करणाऱ्यांसाठी हा महिना खूप खास असतो. कारण आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्यासाठी यापेक्षा चांगली संधी नाही. लवकरच व्हॅलेंटाईन वीक सुरू होणार आहे. संपूर्ण आठवडाभर चालणाऱ्या या व्हॅलेंटाईन वीकमध्ये तुम्ही तुमच्या आवडत्या व्यक्तीला हृदयातील प्रत्येक गोष्ट व्यक्त करू शकता. ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या व्हॅलेंटाईन वीकचा प्रत्येक दिवस खास असतो. तर यंदा व्हॅलेंटाईन वीकमध्ये कोणत्या दिवशी कोणता दिवस आहे जाणून घेऊ…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्हॅलेंटाईन डे वीक ( Valentine Week List 2024)

१) रोज डे, ७ फेब्रवारी २०२४ (बुधवार)

व्हॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियजनांना गुलाबाचे फूल देऊन प्रेम आणि काळजी व्यक्त करू शकता. रंगीबेरंगी गुलाबाची फुलं वेगवेगळ्या भावनांचे प्रतिनिधित्व करतात.

२) प्रपोज डे, ८ फेब्रुवारी २०२४ (गुरुवार)

रोज डे नंतरचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला मनातील सर्व गोष्टी व्यक्त करू शकता.

३) चॉकलेट डे, ९ फेब्रुवारी २०२ (शुक्रवार)

व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपल्या जोडीदाराला चॉकलेट देण्याची प्रथा आहे. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना चॉकलेट बुफे, चॉकलेट बास्केट भेट म्हणून देतात.

४) टेडी डे, १० फेब्रुवारी २०२४ (शनिवार)

टेडी डे हा व्हॅलेंटाईन वीकचा चौथा दिवस आहे. यावेळी लोक आपल्या जोडीदाराला टेडी बेअर देऊन प्रेम व्यक्त करतात.

५) प्रॉमिस डे, ११ फेब्रुवारी २०२४, (रविवार)

व्हॅलेंटाईन वीकचा पाचवा दिवस प्रॉमिस डे म्हणून साजरा करतात. या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना एकत्र राहण्याचे वचन देतात.

६) हग डे, १२ फेब्रुवारी २०२४ (सोमवार)

व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी प्रेमी युगल एकमेकांना मिठी मारून प्रेम आणि आपुलकी व्यक्त करतात.

७) किस डे, १३ फेब्रुवारी २०२४ (मंगळवार)

व्हॅलेंटाईन वीकचा सातवा दिवस किस डे म्हणून साजरा केला जाणार आहे, जो यंदा १३ फेब्रुवारीला आहे.

८) व्हॅलेंटाईन डे, १४ फेब्रुवारी २०२४ (बुधवार)

व्हॅलेंटाईन डे हा व्हॅलेंटाईन वीकचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी प्रेमी युगल सहलीचा, तर कुठे डिनरचा प्लॅन करतात. हा दिवस संस्मरणीय बनवण्यासाठी ते प्लॅन करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentines day 2024 all date and days rose day to kiss day valentines week calendar 2024 in marathi sjr