फेब्रुवारी महिन्यातील १४ फेब्रुवारी या दिवसाला खूप महत्त्व येऊ लागलंय. प्रेमाच्या या दिवसाने तरुणाईला वेड लावलंय असंही म्हटल्यास वावगं ठरणार नाही. अगदी ठरवून या दिवशी कुणी प्रेमात पडत नाही, मात्र तरीही वर्षभर याची तयारी सुरू असते. मग गुलाबाची फुलं, गिफ्ट्स, भेटकार्ड, भेटवस्तू काय द्यायचा या गोंधळात तरुणाई गिफ्टशॉपमध्ये दिसतेच. खरंतर वर्षाचे ३६५ दिवस हे प्रेमाचे असतात पण व्हॅलेंटाइन डे की बात ही कुछ और है! अशावेळी आपल्या प्रियजनांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काही अनोख्या भेटवस्तू द्यायच्या असतील तर हे ऑप्शन बघा.

फुले किंवा फुलांचा पुष्पगुच्छ –

Maghi ganesh chaturthi 2025 wishes messages quotes sms whatsapp facebook status in marathi
Maghi Ganesh Jayanti Wishes : माघी गणेश जयंतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा खास शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
sagittarius horoscope today 30 january 2025
आज धनु राशीच्या लोकांची प्रवासाची हौस होऊ शकते पूर्ण? जाणून घ्या कसा जाईल आजचा दिवस
Numerology Valentine Day 2025
Numerology Valentine Day 2025 : व्हॅलेंटाईन डेच्या आधी ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर होईल प्रेमाचा वर्षाव, जोडीदाराबरोबरचे मतभेद, वाद होतील दूर
republic day 2025 26 January Charoli poem sologan quotes in Marathi
Happy Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा सुंदर मराठी चारोळ्या, WhatsApp, Facebook वर शेअर करा कविता अन् घोषवाक्ये
Republic Day 2025 Wishes SMS Messages Quotes in Marathi
Republic Day 2025 Wishes : प्रजासत्ताक दिनाला द्या हटके शुभेच्छा, प्रियजनांना पाठवा एकापेक्षा एक हटके संदेश
mrinal kulkarni writes special post for husband ruchir kulkarni
मृणाल कुलकर्णींच्या पतीला पाहिलंत का? ‘सोनपरी’ने नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त लिहिली सुंदर पोस्ट, म्हणाल्या…
Video Of Elderly Couple
‘कदाचित हेच प्रेम असते…’ आजोबा हॉस्पिटलमधून घरी आल्यावर आजीने केले असे स्वागत; VIDEO पाहून भरून येईल मन

फुले मुलींना नेहमीच आवडतात. त्यांना केवळ महागड्या वस्तू दिल्यावरच त्या इम्प्रेस होतात हा काहींचा गैरसमज आहे. त्या तुम्ही दिलेल्या एखाद्या आकर्षक पुष्पगुच्छामुळेही इम्प्रेस होतात. त्यामुळे तुम्ही व्हॅलेंटाइन डे दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला गुलाबाचं किंवा इतर कोणतही आकर्षक दिसणारं फुलं घेऊ शकता. शिवाय वेगवेगळी फुले निवडून त्याचा पुष्पगुच्छ बनवून प्रेयसीला देऊ शकता.

परफ्यूम-

आधी सांगितल्याप्रमाणे मुलींना सजायला कार्यक्रमात मिरवायला खूप आवडत त्यामुळे त्यांना परफ्यूम वापरायला खूप आवडचं. परफ्यूम सामान्य वाटत असले तरी ते कधीही आउटडेटेड न होणारे गिफ्ट आहे. मुलींनाही परफ्यूम खूप आवडतात त्यामुळे तुम्ही ते देखील गिफ्ट म्हणून देऊ शकता.

चॉकलेट –

सेफ गिफ्टच्या यादीत चॉकलेटचे देखील नाव येते. मुलींना चॉकलेट्स खूप आवडतात, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही त्यांच्यासाठी चॉकलेट बॉक्स घेऊन जाऊ शकता. मात्र, चॉकलेट्स खरेदी करताना चांगल्या दर्जाची घेऊन जा कारण चॉकलेट्सच्या चॉईसवरुन त्या तुम्हाला जज करु शकतात.

पुस्तके –

जर तुमची प्रिय व्यक्ती पुस्तकप्रेमी असतील. त्यांना चांगली पुस्तके भेट द्या.

फॅशन ज्वेलरी –

गिफ्ट असे असावे की ते थेट हृदयापर्यंत जाईल आणि प्रेयसीला भावेल तर ते गिफ्ट म्हणजे ज्वेलरी. मुलींना दागिने आवडणार नाही असं होऊच शकत नाही. प्रत्येकीला दागिन्यांची स्टाईल वेगळी वेगळी आवडत असली तरी दागिने सर्वांनाच आवडतात. दागिन्यांमध्ये फक्त सोने, चांदी किंवा डायमंडच नाही, तर आजकाल फॅशनच्या दागिन्यांचीही खूप क्रेझ आहे. ते दागिने परवडणाऱ्या दरांमध्ये उपलब्ध आहेत. मोठमोठ्या डिझायनर्सनी डिझाइन केलेल्या दागिने तुमच्या प्रेयसीला इम्प्रेस करु शकत

बॅग किंवा पर्स –

कॉलेजला जाणाऱ्या मुली असो की ऑफीसला सर्वच मुली बॅग वापरतात. क्लासी आणि ट्रेंडी बॅग्ज तर प्रत्येक मुलीच्या अॅक्सेसरीजमधील एक अविभाज्य भाग बनला आहे. कोणतीही बॅग घेण्याती दिवस आता संपले आहेत. उत्तम दर्जाची बॅग ही मुलींसाठी फॅशन बनली आहे. शिवाय अनेक प्रकारच्या आकर्षक बॅग बाजारात उपलब्ध आहेत. अनेक ब्रँडेड पर्स ही एक अशी गिफ्ट आहे जी मुलींना खूप आवडते.

आवडीनुसार द्या गिफ्ट –

वरील गिफ्ट्सपैकी तुम्हाला काहीच पसंत नसेल तर तुम्ही तुमच्या पार्टनरच्या आवडीनुसार त्या संबंधित गिफ्ट देऊ शकता. ज्यामध्ये कोणाला गायणाची आवड असेल किंवा वाचनाची तर त्या कलेशी निगडीत गिफ्ट तुम्ही भेट म्हणून देऊ शकता. अशा प्रकारच्या गिफ्ट देऊन तुम्ही तुमच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम या व्हॅलेंटाईन डे ला वाढवू शकता.

हेही वाचा >> Valentines Day 2024: रोज डे, किस डे ते व्हॅलेंटाईन.. यंदा फेब्रुवारीतल्या प्रेमाच्या दिवसांच्या तारखा काय? इथे पाहा पूर्ण यादी

वेगवेगळ्या देशात व्हॅलेंटाइन डे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. प्रत्येकासाठी प्रेमाच्या संकल्पनाही वेगवेगळ्या असतात. एखादा मुलगा आपल्या ७० वर्षीय आजीलाही गुलाब देऊ तिला व्हॅलेंटाइन बनवू शकतो. एखाद्या आईसाठी आपल्या मुलापेक्षा कोणता प्रेमळ व्हॅलेंटाइन असू शकेल? मित्रदेखील आपला व्हॅलेंटाईन होऊ शकतो. कोणत्याही स्वार्थाविना केलेलं प्रेम हाच व्हॅलेंटाइनचा खरा अर्थ आहे.

Story img Loader