Dal Rice : निरोगी जीवन जगण्यासाठी आरोग्यदायी जेवण घेणेही तितकेच गरजेचे आहे. उत्तम आहार हे चांगल्या आरोग्याचे सीक्रेट आहे. जर तुमचा आहार चांगला असेल, तर तुमचे आरोग्यही चांगले राहते. काही लोकांना वरणभात खूप आवडतो; तर काही लोकांना वरणभात अजिबात आवडत नाही. पण, तुम्हाला वरणभाताचे फायदे माहीत आहेत का? वरणभात हा एक पौष्टिक आहार आहे. त्यामुळे लहानपणापासून आई-वडील मुलांना वरणभात खाण्याची सवय लावतात. आज आपण वरणभाताचे फायदे जाणून घेणार आहोत …
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
- वरणभातामध्ये भरपूर प्रोटीन असते त्याबरोबरच ॲमिनो ॲसिडसुद्धा असते; जे हाडे मजबूत करण्यास मदत करते. त्यामुळे वरणभात नियमिय खाणे गरजेचे आहे.
- वरणभातामध्ये फायबर आणि प्रोटीन असते; ज्यामुळे पचनशक्ती सहज वाढते आणि आपली डायजेस्टीव सिस्टीम खूप मजबूत होते.
- हार्टच्या चांगल्या आरोग्यासाठी वरणभात खाणे आवश्यक आहे. कारण- यामध्ये फायबर, मॅग्नेशियम व फोलेटचे प्रमाण अधिक असते. वरणभाताचे सेवन केल्यामुळे स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.
- वरणभातामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे मेटाबॉलिजम बूस्ट करण्यास मदत करतात आणि तयामुळे शरीराला भरपूर ऊर्जा मिळते. वरणभात खाल्ल्यामुळे वजनसुद्धा कमी होऊ शकते.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
First published on: 09-08-2023 at 16:25 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varan bhaat advantages or dal rice benefits for healthy lifestyle ndj