वास्तुशास्त्रानुसार, जर तुमच्या घरात वास्तुदोष असेल तर त्यामुळे तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. तर काही वेळा विवाहयोग्य तरुण-तरुणींच्या लग्नात अडथळे येतात. अनेकवेळा असे घडते की, खूप शोधाशोध करूनही आपल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी योग्य जो़डीदार सापडत नाही. ते जरी सापडले तरी मध्येच नाते तुटते, याचं कारण वास्तुदोष असू शकतो.

जर तुमच्या मुला-मुलीच्या लग्नात विलंब होत असेल तर या वास्तु टिप्सचा अवलंब करून तुम्ही घरातील दोष दूर करू शकता. याच्या मदतीने तुमच्या घरात लवकरच सनई चौघडे वाजतील.

विवाहयोग्य मुलाची किंवा मुलीची खोली या दिशेला असावी : विवाहयोग्य मुलांची खोली चुकीच्या दिशेला असल्यामुळेही लग्नाला उशीर होऊ शकतो. त्यामुळे जर तुमचा मुलगा किंवा मुलगी लग्नासाठी पात्र ठरली असेल तर त्यांची खोली उत्तर-पश्चिम दिशेला असावी आणि त्यांनी वायव्य दिशेला झोपावे. जर खोली पश्चिम कोनात नसेल तर त्याने उत्तर दिशेला झोपावे.

खोलीचा रंग : रंगांचा माणसाच्या जीवनावरही परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार विवाहित मुलाच्या किंवा मुलीच्या खोलीचा रंग हलका गुलाबी असावा. अन्यथा असा रंग असा असावा की तो डोळ्यांना टोचणार नाही. आपल्या विवाहयोग्य मुला-मुलीच्या खोलीचा रंग जास्त गडद, ​​तपकिरी, निळा किंवा काळा नसावा याची पालकांनी काळजी घ्यावी.

आणखी वाचा : Vivah Muhurat 2022: 2022 मध्ये लग्नासाठी ‘हे’ आहेत सर्वात शुभ मुहूर्त, जाणून घ्या लग्नासाठी कोणते दिवस उत्तम आहेत ?

मँडरीन बदक: ज्यांच्या लग्नाला उशीर होत आहे, त्यांनी आपल्या खोलीत मँडरीन बदकांची एक जोडी ठेवावी, ज्यामध्ये एक नर आणि एक मादी असेल. असे केल्याने त्यांचं लग्न लवकर होईल.

आणखी वाचा : Vivah Panchami 2021: ‘या’ दिवशी लग्न करणारे लोक खूप दुःखी जीवन जगतात, याचे खास कारण पुराणात सांगितले आहे

पलंग भिंतीला लागून नसावा : वास्तुशास्त्रानुसार ज्या लोकांना लग्न करायचं आहे, त्यांनी बेड आपल्या कमरेला अशा प्रकारे ठेवावा की ते दोन्ही बाजूंनी त्याचा वापर करू शकतील. बेड भिंतीला लागून नाही याची खात्री करा. कारण त्यामुळे वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकतात.