वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशा ही कुबेर देवतेची मानली जाते. या दिशेला दोषांपासून मुक्त ठेवल्याने धनात वृद्धी होते असे म्हणतात. आर्थिक कार्यासाठी ही दिशा उत्तम मानली जाते. वास्तूनुसार घराची उत्तर दिशा नेहमी उघडी आणि स्वच्छ ठेवावी. तसेच या ठिकाणी जड वस्तू ठेवू नयेत. असं म्हणतात की घराच्या उत्तर दिशेला जागा जितकी रिकामी असेल तितकी घरात सुख-समृद्धी येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घराचे प्रवेशद्वार आणि शयनकक्ष उत्तर दिशेला बनवण्याचा सल्ला दिला जातो. वास्तूनुसार असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते. उत्तर दिशेला आरसा लावणे शुभ मानले जाते. आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. यामुळे संपत्तीत वाढ होते. कुबेर देवतेची मुर्ती उत्तर दिशेला ठेवणे देखील उत्तम आहे. यामुळे नोकरीच्या संधी खुल्या होतात आणि करिअरमध्ये प्रगती होते.

घराचे स्वयंपाकघर उत्तर दिशेला असेल तर त्या घरातील अन्नधान्याचे भांडार नेहमी भरलेले असते. कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही. कुटुंबात कलहाचे वातावरण असेल किंवा प्रगती होत नसेल तर उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे. असे मानले जाते की यामुळे आनंद मिळतो. या दिशेच्या भिंतींवर निळ्या रंग लावावा. यामुळे पैसे कमावण्याची शक्यता वाढते.

घराच्या उत्तर दिशेच्या बाबतीत काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे, जसे की या दिशेच्या भिंतीला तडा जाणे अशुभ मानले जाते. त्यामुळे प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात. धनहानी होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे क्रॅक दिसल्यास त्वरित दुरुस्त करा. या दिशेला कधीही खूप जड वस्तू ठेवू नका. ही दिशा शक्य तितकी रिकामी ठेवा. वास्तूनुसार ही दिशा जितकी रिकामी आणि स्वच्छ राहते, तितकी घरातील लोकांची प्रगती होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu shastra it is beneficial to keep these things in the north direction of the house to increase wealth scsm