बहुतेक लोकांच्या घरात, भिंतीवर ७ घोड्यांचे चित्र आढळते. काही लोक हे चित्र डेकोरेशन म्हणून लावतात. मात्र काही लोकांचं हे चित्र आपल्या घराच्या भिंतीवर लावण्यामागे काही खास कारण असते. वास्तुशास्त्रानुसार ७ घोड्यांचे पेन्टिंग घरात लावणे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की हे चित्र घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्यामुळे कुटुंबातील लोकांना प्रगती आणि यश मिळते. परंतु ही पेन्टिंग तुम्ही घरात योग्य दिशेला लावला तरच याचा फायदा मिळू शकतो. हे पेन्टिंग घरात कशा पद्धतीने लावायला हवी या बद्दलची माहिती जाणून घ्या.
७ घोड्यांचे कोणते चित्र निवडावे
७ घोड्यांचे चित्र विकत घेताना लक्षात ठेवा की चित्रातील घोड्यांना लगाम बांधले जाऊ नयेत. तसेच, त्यांचा चेहरा आनंदी मुद्रामध्ये असावा. घोडे रागावलेले दिसू नयेत. सात घोडे योग्यपणे दिसायला हवेत. घोडे धावताना दिसायला हवे.
हे चित्र कुठे लावावे
हे चित्र लावण्यासाठी पूर्व दिशा चांगली मानली जाते. म्हणजेच घराच्या पूर्वाभिमुख भिंतीवर लावू शकता. व्यवसायाच्या ठिकाणी केबिनमध्ये सात धावत्या घोड्यांची छायाचित्रे लावावीत. लक्षात ठेवा की चित्र अशा प्रकारे लावावे की घोडे दरवाजातून आत येत आहेत असे दिसतील. हे चित्र दक्षिण भिंतीवरही लावता येईल. हे चित्र घराच्या हॉलमध्ये लावावे.
आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व
७ घोड्यांचे चित्र लावण्याचे फायदे
वास्तूशास्त्रानुसार हे चित्र घरात लावल्याने घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहतो. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या क्षेत्रात यश प्राप्त होते. चांगली नोकरी आणि नोकरीत बढती मिळण्यास यामुळे मदत होते. समाजात मान-सन्मान वाढतो. सुख सोयीच्या वस्तूंमध्ये वृद्धी होते.
(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)