Vasubaras Rangoli: आजपासून दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे. आज २८ ऑक्टोबर रोजी वसुबारस साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. गाईची सेवा केली जाते. गाईला आईचं स्थान दिलं जातं. दिवाळीची खरी सुरुवात गाईची पूजा करून, म्हणजेच वसुबारस या सणापासून होते.

दिवाळी म्हटली की, घरात रोषणाई, दिवे, फराळ, कंदील या गोष्टी जशा सर्वप्रथम डोळ्यांसमोर येतात. त्याचप्रमाणे दिवाळीत रांगोळीचंही फार महत्त्व आहे. घरोघरी, दारोदारी लहान असो किंवा मोठी रांगोळी ही काढलीच जाते. आज वसुबारस या खास दिनानिमित्त आपण सोप्या पद्धतीनं आकर्षक रांगोळी कशी काढावी ते जाणून घेणार आहोत.

हेही वाचा… Kandil making at home: स्वस्तात मस्त! घरच्या घरी बनवा आकर्षक कंदील, या दिवाळीत वापरा ‘ही’ सोपी पद्धत आणि वाचवा पैसे

रांगोळी क्रमांक १

सर्वप्रथम खडूने मध्यम आकाराची गोल अशी आऊटलाइन काढून, त्यात गाय आणि वासराचं सुरेख चित्र काढून घ्या. त्यानंतर काळ्या रंगानं त्याला बॉर्डर देऊन, आत सफेद रंग भरा. त्यानंतर काळ्या रंगानं यात दाखविल्याप्रमाणे रेखीव डोळे काढून घ्या आणि बॅकग्राउंड गुलाबी रंगानं भरा. तसंच यावर तुम्ही वसुबारस असंही लिहू शकता. जमल्यास बाजूनं जिलेबीच्या आकाराची बॉर्डर करून घ्या.

ही रांगोळी @dailyrangolibybhoomi या यूट्यूब चॅनेलवरून घेण्यात आलेली आहे.

रांगोळी क्रमांक २

एक गोलाकार वस्तू ठेवून, त्याच्या आत चाळणीच्या साह्यानं हिरवा रंग पसरवून घ्या. हिरव्या रंगानंतर त्याच्या दोन लाईट शेड्सचा वापर करून, आत रंग भरा. म्हणजेच बाहेरील गोलात हिरवा रंग पसरवून झाल्यानंतर आत फिकट हिरवा रंग व सगळ्यात आतील गोलाकार भागात पोपटी रंग पसरवून घ्या. त्यावर सफेद रांगोळीनं त्यात दाखविल्याप्रमाणे दोन्ही बाजूंना तीन गोल काढून घ्या. आता या व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे त्याला गाईच्या मुखाचा आकार द्या. बॉर्डरला फुले काढून रांगोळी पूर्ण करा.

ही रांगोळी @goures03 या यूट्यूब चॅनेलवरून घेण्यात आलेली आहे.

रांगोळी क्रमांक -३

प्रथम एक गोलाकार तयार करा. त्याच्या मध्यभागी खालच्या बाजूला एका कमळाची रांगोळी काढा. उरलेला भाग निळ्या रंगानं भरा. वर गोलाकाराच्या दोन्ही बाजूंना व्हिडीओत दाखविल्याप्रमाणे गाईचं गोमुख काढा. वरच्या बाजूला मधोमध वसुबारस, असं लिहा आणि बाजूनं गोल ठिपके काढून, ही सोपी रांगोळी झटक्यात पूर्ण करा.

ही रांगोळी @swatiandshiuuart8034 या यूट्यूब चॅनेलवरून घेण्यात आली आहे.