Vat Savitri Vrat 2022 Wishes in Marathi: दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी वटवृक्षाची पूजा करतात. यावर्षी १४ जून रोजी मंगळवारी वटपौर्णिमेचा उपवास ठेवण्यात येणार आहे. वटवृक्षात त्रिदेव म्हणजेच ब्रह्मा, विष्णू, महेश राहतात. त्याचबरोबर वटवृक्षाची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते असं मानले जाते, त्यामुळे हिंदू धर्मात वटवृक्षाला खूप महत्त्व दिले जाते. उत्तर भारतात याला वट सावित्री व्रत आणि दक्षिण भारतात वटपौर्णिमा व्रत म्हणतात. हल्ली कोणताही सण असो शुभेच्छा स्टेटस हे महत्त्वाचे ठरतात. म्हणूनच वटपौर्णिमेच्या खास दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी घेऊन आलोय मराठी शुभेच्छा मेसेज (Marathi Wishes, Images, WhatsApp Status, Greeting)
आनंद आणि दु: खात, आपण
प्रत्येक क्षण एकमेकाबरोबर एकत्र राहू,
एक जन्म नव्हे तर सात जन्म,
आपण पती-पत्नी राहू.
वट सावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
(हे ही वाचा: Vat Purnima 2022 : वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा का करतात माहित आहे का? यामागेही आहेत रंजक कारणे)
आपल्या प्रेमाला वटवृक्षासारखी
पालवी फुटू दे,
यश तुम्हाला भर भरून मिळू दे
आणि आयुष्य
तुम्हाला वटवृक्षासारखच दीर्घ लागु दे.
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!!
प्रत्येक क्षणा क्षणाला,
आपल्या संसाराची गोडी वाढत राहो,
आपल्या जन्मोजन्मीचा प्रत्येक क्षण,
सुखाचा, प्रेमाचा, आनंदाचा,
भरभराटीचा जावो.
वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा !!!
दोन क्षणाचे भांडण
सात जन्माचे बंधन
लाभून तुमची साथ झाले मी पावन
नेहमी आनंदी राहो आपले सहजीवन
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
सावित्रीच्या निष्ठेचं दर्पण
बांधुनी जन्मोजन्मीचे बंधन
करते सातजन्माचे समर्पण
वटपौर्णिमेच्या शुभेच्छा !!
(हे ही वाचा: Vat Purnima 2022: उद्या आहे अखंड सौभाग्यासाठी ठेवला जाणारा ‘वटपौर्णिमेचा व्रत’; जाणून घ्या पुजेचा मुहूर्त आणि योग्य विधी )
मोठ्यांचा आशीर्वाद, पतीचे प्रेम, सर्वांच्या शुभेच्छा लाभू द्या!
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
सण सौभाग्याचा, बंध हा अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
या वडाच्या झाडाइतका दीर्घायुषी असावास तू,
जन्मोजन्मी माझा आणि माझाच असवास तू…
वटसावित्रीच्या हार्दिक शुभेच्छा!!
एक फेरा आरोग्यासाठी, एक फेरा प्रेमासाठी, एक फेरा यशासाठी
एक फेरा दीर्घायुष्यासाठी, एक फेरा तुझ्या माझ्या अतूट सुंदर नात्यासाठी
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
पतीच्या दीर्घायुष्यासाठी निष्ठेचं बंधन,
सात जन्माच्या सोबतीसाठी जन्मोजन्मीचं समर्पण
वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!!
(मेसेज क्रेडीट: सोशल मीडिया)