दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची अ‍ॅलर्जी असणाऱ्यांना बाजारात सोया आणि बदाम दुधाचा पर्याय उपलब्ध आहे. शाकाहारी दुधाला वनस्पतीचे दूध किंवा नट दूधही म्हंटलं जातं. डेअरी दुधाला पर्याय म्हणून हे पेय शेकडो वर्षांपासून वापरले जाते. मात्र बदाम आणि सोया दूध थोडं महाग आहे. त्यामुळे लोकं कित्येक दिवसापासून एका चांगल्या पर्यायाची वाट पाहात होते. आता बटाट्याच्या दुधाची भर पडल्याने हा प्रश्न सुटणार आहे. बटाट्याचं दूध स्वस्त असल्याने खिशाला परवडणारं आहे. त्याचबरोबर बटाट्याच्या दुधात चरबी आणि साखर कमी असते. त्यामुळे बटाट्याच्या दुधाची मागणी वाढेल, असं एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे. ऑलरेड पॅक केलेले बटाटे दूध ब्रिटनच्या बाजारपेठेत विकले जाते. डीयूजी नावाची कंपनीने बटाटे दूध बाजारात आणलं आहे. स्वीडनस्थित कंपनीने युरोपीय देशांमध्ये आपले पाय रोवले असून चीन आणि अमेरिकेच्या बाजारपेठांवर लक्ष ठेवून आहे.

बटाट्याचे दूध कसे बनवतात?
बटाट्यापासून दूध बनवणे हे केवळ कंपन्यांचे काम नाही, तर तुम्ही ते स्वतः घरी बनवू शकता आणि अनेक पाककृती ऑनलाइन उपलब्ध आहेत. तुम्हाला प्रथम बटाटे उकळवावे लागतील आणि नंतर ते ब्लेंडरमध्ये टाकून बारीक करावे लागतील. या प्रक्रियेत थोडे पाणीही लागेल. हे मिश्रण फिल्टर केल्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून घट्ट किंवा पातळ करून वापरू शकता. तथापि, बटाट्यांव्यतिरिक्त, पॅक केलेल्या दुधामध्ये वाटाणा प्रथिने, फायबर, रेपसीड तेल, साखर आणि कॅल्शियम कार्बोनेटसह अनेक गोष्टी असतात. एक ग्रॅम सर्व्हिंगमध्ये सोया दुधापेक्षा चार पट जास्त प्रोटीन बटाट्याच्या दुधात असते, असं बोललं जातं. या दुधाचे गुण परदेशात आधीच सांगितले जात आहेत. परंतु भारतात फक्त काही लोकच या रेसिपीशी परिचित आहेत.

बटाट्याचे दूध चरबीमुक्त असते. त्यामुळे फॅट वाढण्याची शक्यता नसते. बटाट्याच्या दुधात फायबर, प्रोटिन्स आमि कार्बोहायड्रेट असतं. तसेच व्हिटॅमिन डी बी१ आणि फॉलिक अ‍ॅसिड असतं. या दुधाचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. दुसरीकडे, बटाटे पिकवण्यासाठी फारसे कष्ट आणि भांडवल लागत नाही. म्हणजेच आरोग्यासोबतच बदाम आणि सोया दुधापेक्षा बटाटा दुधाचा हा पर्याय स्वस्त असेल.

Story img Loader