उच्च रक्तदाबाच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्य रक्तदाब १२०/८० mmHg इतका असतो. यापेक्षा जास्त झाल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होतो. उच्च रक्तदाबामुळे मेंदू, हृदय यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांचे नुकसान होण्याची शक्यता असते. यासह अशा रुग्णांच्या आरोग्याबाबत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे हा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी तब्बेतीची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. आहारात काही भाज्यांचा समावेश केल्याने उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास फायदेशीर ठरू शकते, कोणत्या आहेत त्या भाज्या जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ब्रोकोली
ब्रोकोलीमध्ये फ्लॅवोनाईड्स आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत मिळते. तसेच यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम आढळते आणि ते शरीरातील नायट्रिक ऑक्साइडचा स्तर वाढवते यांमुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. हायपरटेन्शनच्या रुग्णांना रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी ब्रोकोली फायदेशीर ठरू शकते.

आणखी वाचा : हिवाळ्यात होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी मदत करतात ‘हे’ पदार्थ; लगेच करा आहारात समावेश

गाजर
गाजरामुळे सिस्टोलिक ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवले जाऊ शकते. गाजरामध्ये अँटिऑक्सिडेंट मुबलक प्रमाणात आढळतात, त्यामुळे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये अनेक पोषकतत्व आढळतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

पालक
पालकमध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम आढळते, जे रक्तदाब नियंत्रण ठेवण्यासाठी फायदेशीर मानले जाते. त्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींना पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetables for high bp patients spinach broccoli tomato carrot include these in your diet blood pressure will be under control pns