“शाकाहारी आणि मांसाहारी थाळीची किंमतीमध्ये नोव्हेंबर २०२३ मध्ये अनुक्रमे १० टक्के आणि ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत अनुक्रमे ५८ टक्के आणि ३५ टक्के वाढ झाल्याने थाळीच्या किंमतीमध्येही वाढल्या आहेत. सणासुदीच्या काळात वाढत्या मागणीमुळे आणि खरीप हंगामातील अनियमित पावसामुळे यंदा उत्पादन कमी झाल्यामुळे कांदा टोमॅटोच्या किंमतीती ही वाढ झाली आहे” अशी माहिती क्रिसिल (CRISIL MI&A) अहवालातून समोर आली आहे.

मांसाहारी थाळीच्या किंमतीही झाली वाढ

महिन्याभरात मांसाहारी थाळीची किंमत शाकाहारी थाळीच्या तुलनेत कमी वेगाने वाढली कारण ब्रॉयलर चिकनच्या किंमतीत १-३ टक्क्यांनी किरकोळ घट झाली आहे, जे मांसाहारी थाळीच्या किंमतीच्या ५० टक्के आहे, असे CRISIL ने अहवालात म्हटले आहे. मांसाहारी थाळीची किंमत ऑक्टोबरमध्ये ५८.२ रुपये होती जी नोव्हेंबर २०२३ मध्ये ६१.२ रुपये झाली आणि शाकाहारी थाळीची किंमत ऑक्टोबरमध्ये २७.५ रुपये होती जी नोव्हेंबर २०२३ मध्ये ३०.३ रुपये इतकी झाली आहे.

Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Prices will increase due to reduced arrival of chillies Nandurbar news
यंदा लाल तिखटाचा भडका उडणार; मिरचीची आवक घटल्याने दर वाढणार
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
Minor boy beaten up in shop two suspects arrested
दुकानात अल्पवयीन मुलास मारहाण, दोन संशयित ताब्यात
Manghar Transformation into India First Honey Village in crisis
महाबळेश्वरमधील ‘मांघर’च्या मधमाश्यांवर संकट
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
onion prices loksatta news
कांदा स्वस्त; गृहिणींना दिलासा, आठवडाभरात किलोमागे २० ते २५ रुपयांनी घट

शाकाहारी थाळीच्या किंमती का वाढल्या?

कांदा आणि टोमॅटोच्या किंमतीत अनुक्रमे ९३ टक्के आणि १५ टक्क्यांनी वाढ वर्षभरात झाल्यामुळे शाकाहारी थाळीच्या किंमतीत वर्षभरात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. शाकाहारी थाळीच्या किंमतीत ९ टक्के वाटा असलेल्या डाळींच्या किंमतीही वर्षभरात २१ टक्क्यांनी वाढल्या आहेत.

हेही वाचा – व्हेगन आहारामुळे खराब कोलेस्ट्रॉल झटपट कमी होऊ शकते का? नव्या अभ्यासाबाबत तज्ज्ञ काय सांगतात…

असा काढला जातो घरगुती थाळीचा खर्च?

घरी थाळी तयार करण्यासाठी सरासरी खर्च हा उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतात प्रचलित असलेल्या किमतींच्या आधारे काढला जातो. मासिक बदलामुळे सामान्य माणसाच्या खर्चावर होणारा परिणाम यावरून दिसून येतो. रेटिंग एजन्सीनुसार, थाळीच्या किंमतीत बदल करणारे घटक (तृणधान्ये, कडधान्ये, ब्रॉयलर, भाजीपाला, मसाले, खाद्यतेल, स्वयंपाकाचा गॅस) यांबाबतची माहिती देखील स्पष्ट करते. शाकाहारी थाळीमध्ये चपाती, भाज्या (कांदा, टोमॅटो आणि बटाटा), तांदूळ, डाळ, दही आणि सॅलड यांचा समावेश होतो. मांसाहारी थाळीसाठी, हे घटक समान राहतात परंतु डाळऐवजी चिकनचा समावेश केला जातो.

सांख्यिकी मंत्रालयाच्या ( ministry of statistics) आकडेवारीनुसार, “भारतातील किरकोळ महागाई सप्टेंबरमध्ये ५.०२ टक्क्यांच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये ४.८७ टक्क्यांवर घसरली आहे. या आठवड्यात होणाऱ्या RBI च्या चलनविषयक धोरण समितीने (MPC) ऑक्टोबरच्या धोरण बैठकीत रेपो दर ६.५० टक्क्यांवर कायम ठेवला.”

पाच जणांच्या कुटुंबासाठी थाळीसाठी १४-१५ टक्के अतिरिक्त खर्च करावा लागणार

थाळीच्या किमती वाढल्या म्हणजे पाच जणांच्या कुटुंबाला शाकाहारी थाळी तयार करण्यासाठी १४ रुपये आणि दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी मांसाहारी थाळीसाठी १५ रुपये अतिरिक्त खर्च करावे लागतील. जर त्यांनी दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणासाठी थाळी तयार केली तर, पाच सदस्यांच्या कुटुंबासाठी शाकाहारी थाळीसाठी दरमहा ८४० रुपये आणि मांसाहारी थाळीसाठी ९०० रुपये अतिरिक्त खर्च येईल.

पाच सदस्यीय कुटुंबाकरिता दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणासाठी, शाकाहारी थाळी तयार करण्यासाठी दरमहा ४,५४५ रुपये आणि मांसाहारी थाळीसाठी ९,१८० रुपये एकूण खर्च येईल.

हेही वाचा – दिलदारपणा असावा तर असा! रस्त्यावर कार साफ करणाऱ्या मुलांना व्यक्तीने फाइव्ह स्टार हॉटलेमध्ये दिली ट्रिट, Video Viral

ग्रामीण भागातील कामगारांच्या कुटुंबाना करावी लागणार तडजोड

RBI च्या आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये ग्रामीण भागातील पुरुष कृषी कामगारांना भारतात सरासरी ३२३.२ रुपये मजुरी मिळाली. जर त्यांनी महिन्यात २० दिवस काम केले तर त्यांचे मासिक उत्पन्न दोन व्यक्तींसाठी सुमारे १३,००० रुपये असेल. जर घरामध्ये दोन कमावते सदस्य असतील, तर ७० टक्के वेतन महिन्यासाठी शाकाहारी थाळी (दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दोन्ही) तयार करण्यासाठी जाईल. शिक्षण, आरोग्य, कपडे, प्रवास आणि ऊर्जा यावरील खर्च ३० टक्के शिल्लक राहतीलहे. कुटुंबांना दैनंदिन जेवणाचा दर्जा आणि सोयीसुविधा याबाबत तडजोड करावी लागेल आणि कौटुंबिक अर्थसंकल्प नियंत्रणात ठेवण्यासाठी अन्न खर्चात कपात करावी लागेल.

Story img Loader