प्रथिने केवळ आपल्या शरीरासाठीच नव्हे तर स्नायूंच्या निर्मितीसाठीही आवश्यक असतात. वास्तविक, प्रथिने हा ऑक्सिजन, हायड्रोजन आणि नायट्रोजनपासून बनलेला एक घटक आहे, जो शरीराला आतून आणि बाहेरून मजबूत बनवू शकतो. प्रथिने आपल्या शरीरातील स्नायू आणि हाडे मजबूत करण्यास मदत करतात. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे मांस, मासे, अंडी. पण शाकाहारी जेवणातही प्रथिनांचे अनेक स्रोत असतात. ज्यामध्ये अंडी आणि मांसपेक्षा जास्त प्रोटीन आढळते. आज आपण अशा काही प्रथिनांनी समृद्ध पदार्थांबाबत जाणून घेऊया ज्यांचा तुम्ही आपल्या आहारात समावेश करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ओट्स :

ओट्स प्रथिनांचा चांगला स्रोत मानला जातो. एक कप सुक्या ओट्समध्ये सुमारे १२ ग्रॅम प्रथिने असतात. त्यात मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस आणि फोलेट देखील असतात. प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी तुम्ही नाश्त्यात ओट्सचे सेवन करू शकता.

Photo : शरीराला थंडावा देण्यासोबतच ‘हे’ देखील आहेत काकडीचे महत्त्वाचे फायदे

हिरवे वाटाणे :

हिरवे वाटाणे केवळ चविष्टच नाहीत तर ते आरोग्यही राखण्यास मदत करतात. फायबर, पोटॅशियम, जीवनसत्त्वे, तांबे असे अनेक घटक हिरव्या वाटाण्यांमध्ये आढळतात. आहारात हिरव्या वाटण्याचा समावेश करून तुम्ही प्रोटीनच्या कमतरतेवर मात करू शकता.

सोयाबीन :

शाकाहारी लोकांसाठी सोयाबीन प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. १०० ग्रॅम कच्च्या सोयाबीनमध्ये ३६ ग्रॅमपर्यंत प्रथिने आढळतात. तुम्ही सोयाबीन सोया चप, न्यूट्रिगेट या स्वरूपात खाऊ शकता.

पनीर :

पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत मानला जातो. जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्ही पनीरचा आहारात समावेश करू शकता. केवळ प्रथिनेच नाही तर यामध्ये व्हिटॅमिन बी-१२, लोह, कॅल्शियम आणि अनेक जीवनसत्त्वे आढळतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहण्यास मदत होते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vegetarians should include these foods in their diet instead of eggs and meat get the most protein pvp