व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या सर्वात महत्वाच्या पोषक तत्वांपैकी एक आहे.व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील कॅल्शियमचे शोषण आणि हाडे मजबूत करण्यासाठी आवश्यक घटक आहे. तसेच यामुळे दात मजबूत होतात. तथापि, तुम्हाला व्हिटॅमिन डीने समृद्ध असलेल्या अनेक मांसाहारी गोष्टी मिळतील. पण शाकाहारी लोक देखील काही गोष्टी सहज खाऊ शकतात. जेणेकरून त्यांच्या शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासणार नाही आणि ते आतून निरोगी राहू शकतील.
याशिवाय दररोज अर्धा तास उन्हात बसावे. यामुळे हाडे देखील मजबूत असतात.अशा परिस्थितीत आज आपण जाणून घेणार आहोत की शाकाहारी लोक त्यांच्या शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता कशी पूर्ण करू शकतात.
शाकाहारी लोकांनी या गोष्टी खाव्यात
- दूध :
दुधात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असते. तसेच दूध हा संपूर्ण आहार मानला जाऊ शकतो. यामध्ये सर्व प्रकारची पोषक तत्वे आढळतात. यामध्ये प्रथिने आढळतात.अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या आहारात दुधाचा समावेश करू शकता.
तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण
- दही :
दुधापासून बनवलेले दही हे उन्हाळ्यासाठी उत्तम आहे. दह्याचे सेवन केल्याने तुमचे शरीर आतून थंड होते आणि हायड्रेट देखील राहते. दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी असलेल्या लोकांसाठी दही एक परिपूर्ण प्रोबायोटिक म्हणून काम करू शकते. यामध्ये प्रथिने आणि कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात. याचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता पूर्ण होऊ शकते.
- मशरूम :
मशरूम व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. आपण ते सूप किंवा सॅलडच्या स्वरूपात आहारात समाविष्ट करू शकता. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता भासत नाही. शरीरातील व्हिटॅमिन डीची कमतरता मशरूमच्या सेवनाने पूर्ण होते.
- संत्र्याचा रस :
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात आढळते. एक ग्लास संत्र्याचा रस प्यायल्याने तुमच्या शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची कमतरता होत नाही.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)