गेल्या काही दिवसात टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या प्रीपेड प्लानमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे ग्राहक इतर कंपन्यांच्या प्लानशी तुलना करत नंबर पोर्ट करत आहेत. त्यामुळे आपले ग्राहक कमी होऊ नये, यासाठी आकर्षक प्लान ग्राहकांना ऑफर करत आहेत. व्होडाफोन आयडियाने आपल्या ग्राहकांसाठी चार नवीन प्लान आणले आहेत. १५५ रुपये, २३९ रुपये, ६६६ रुपये आणि ६९९ रुपयांचा प्लान आहे. या नव्या प्लानमध्ये ग्राहकांना ३ जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉल्ससह अनेक फायदे मिळतात.
प्लान | सुविधा |
१५५ रुपये | अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १ जीबी डेटा मिळतो. मोफत एसएमएस सेवा नाही. २४ दिवसांचा कालावधी आहे. |
२३९ रुपये | अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १ जीबी डेटा मिळतो. दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. २४ दिवसांचा कालावधी आहे. |
६६६ रुपये | अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १.५ जीबी डेटा मिळतो. दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. ७७ दिवसांचा कालावधी आहे. |
६६९ रुपये | अनलिमिटेड कॉलिंग, एकूण ३ जीबी डेटा मिळतो. दररोज १०० मोफत एसएमएस करता येणार आहेत. ५६ दिवसांचा कालावधी आहे. |