How To Make Soft Chapati Round Video: पोळीचं काय आहे बुवा, गोल करा नाहीतर नकाशे करा नंतर खायची तोडूनच ना? काय ओ पोटात गेल्यावर कळतं का पोळी गोल होती की चौकोनी? बाई पोळी करायची म्हणजे लई ताप, कणिक मळा, लाटा, भाजा बरं एवढंच नाही नंतर परातभर भांडी घासा, डोक्याला ताप नुसता! या व अशा असंख्य प्रश्न वजा तक्रारी आपण ऐकल्या किंवा प्रसंगी केल्याही असतील पण तरीही आपल्यालाही छान गोलाकार, मऊ व टम्म फुगणारी पोळी करता यावी अशी इच्छा काही संपत नाही. इतरांसाठी नव्हे तर निदान आपल्यालाच छान सजवलेलं ताट पुढ्यात यावं यासाठी पोळ्या शिकण्याचा हट्ट तरी नक्कीच प्रत्येकाने करायला हवा. ज्यांना पोळपाट लाटणं वापरून पटापट पोळ्या लाटता येत नाहीत त्यांच्यासाठी अलीकडे बाजारात अनेक मशिन्स व तांत्रिक गोष्टी उपलब्ध आहेत पण एकतर हे सगळं महाग असतं किंवा आणलं तरी यात अनेकदा पोळ्या कडकच होतात. अशावेळी एक सोपा उपाय काय करावा हे आपण आज पाहणार आहोत.

@पुणेरी तडका अशा युट्युब चॅनेलवर गोलाकार पोळ्या करण्याची सोपी पद्धत शेअर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पोळपाट लाटणं सुद्धा वापरावं लागणार नाही. फक्त १ लिटर तेलाची रिकामी पिशवी आणि एक ताट वापरून हव्या तेवढ्या पोळ्या आपण करू शकणार आहात. बरं का मंडळी एका पोळीसाठी मोजून ५ ते १० सेकंदाचा वेळ सुद्धा पुरेल अशी ही हॅक आहे. कसा करायचा हा जुगाड बघा.

Jaggery Makhana recipe
उपवासाच्या दिवशी आवर्जून बनवा गूळ मखाणा; एकदम सोपी रेसिपी
Rohit Patil
Rohit Patil : “अमृताहुनी गोड…”; विधानसभेत रोहित पाटलांचं…
Nutritious laddoos Recipe
फक्त १० मिनिटांत बनवा पौष्टिक लाडू; पटकन वाचा साहित्य आणि कृती
How to Choose the Perfect Kitchen Container Set
Kitchen Containers : मसाले, पीठ, बिस्किटे ठेवण्यासाठी कोणते कंटेनर वापरायचे? मग हे ५ पर्याय पाहा; स्वयंपाकघराचा लूकच बदलेल
Viral Video Shows How To Pack Rasgulla
पॅकबंद डब्यातील रसगुल्ले खाताय? मग ‘हा’ VIRAL VIDEO अगदी शेवटपर्यंत बघा, अंगावर येईल काटा
Crispy Corn Recipe easy corn recipe for snacks
Crispy Corn Recipe: काहीतरी चटपटीत खायचंय? अवघ्या १० मिनिटांत बनवा मक्याची ‘ही’ रेसिपी
How to keep green coriander fresh for 2-3 days without a fridge
Kitchen Jugaad : फ्रिज न वापरता २-३ दिवस कोथिंबीर अशी ठेवा हिरवीगार, भन्नाट जुगाड पाहून व्हाल थक्क; Viral Video
chana chat recipe
चमचमीत खायचं मन करतंय? मग या सोप्या पद्धतीने बनवा ‘चना चाट’, लिहून घ्या साहित्य आणि कृती

१) नेहमीप्रमाणे पोळीसाठी कणिक भिजवून मळून घ्या.
२) तेलाची रिकामी पिशवी आडवी कापून घ्या जेणेकरून ती पुस्तकासारखी उघडता येईल.
३) यामध्ये खालच्या बाजूला कणकेचा गोळा ठेवा. दुसऱ्या बाजूची पिशवी गोळ्यावर टाका.
४) वरून ताटाने हलका दाब द्या ज्यामुळे गोळा चपातीच्या आकारात गोलाकार पसरेल.
५) चिकटू नये यासाठी पीठ जास्त मऊ मळू नका आणि हो, थोडं पीठ भुरभुरायला विसरू नका.
६) नेहमीप्रमाणे पोळी भाजून घ्या.

हे ही वाचा<< झोपण्याआधी बेंबीमध्ये ‘या’ तेलाचे तीन थेंब टाकल्यास मिळू शकतात जादुई फायदे; थंडीतील ४ प्रश्न लगेच सुटतील

एक प्रो टीप सांगायची तर नेहमीच तुमच्याकडे तेलाची पिशवी रिकामी असेल असं नाही म्हणजे तुम्ही स्टोअर जरी करून ठेवली तरी काही दिवसाने तेल संपलं की काही त्या पिशवीचा वापर नाही. अशावेळी तुम्ही त्या पिशवीला तेल लावून मग वरची पद्धत फॉलो करू शकता. कोकणात अशा प्रकारे वडे सुद्धा केले जातात फक्त त्यावेळी हाताने थापले जातात आणि आता तुम्हाला ताटाचा वापर करायचा आहे. ही हॅक तुमच्या कामी येतेय का कमेंट करून सांगा.

Story img Loader