Diwali Cleaning Money Saving Tips: आता अवघ्या आठवड्याभरावर दिवाळीचा सण आला आहे. तुमच्याही घरात आतापर्यंत दिवाळीची साफसफाई, रंगरंगोटी, सुरु झाली असेलच हो ना? यंदा तुमचा घरातल्या भिंतींना रंगकाम करण्याचा बेत नसेल आणि तरीही भिंती नव्याने रंगवल्यासारख्या सुंदर दिसाव्या अशी इच्छा असेल तर त्यासाठी आज एक सोपा जुगाड आम्ही दाखवणार आहोत. अनेकदा घरात लहान मुलं असतील तर त्यांची क्रिएटीव्हीटी दाखवण्यासाठी भिंती हा त्यांचा पहिला कॅनव्हास असतो. तुमची गोड मुलं तुम्हाला कितीही प्रिय असली तरी या पेन्सिलच्या रेघोट्या, पेनाने काढलेली चित्र, घराची शोभा घालवतात असंही वाटणं गैर नाही. अगदी लहान मुलं नसली तरी आपल्याकडूनच काही वेळा पटकन जेवणाचा, तेलाचा हात भिंतीला लागून भिंतीवर डागही पडतात हे सगळे प्रश्न अवघ्या १० रुपयांमध्ये सोडवण्याची भन्नाट ट्रिक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
@beboholic_Shraddha या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये भिंतींवर रेघोट्या घालवण्याचा जुगाड सांगण्यात आला आहे. यासाठी त्यांनी टूथ पावडर म्हणजेच दात घासण्याची पावडर वापरली आहे. पण व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे आपण यासाठी टूथ पेस्ट सुद्धा वापरू शकता. एका वाटीत हवी तेवढी टूथ पेस्ट/ पावडर घेऊन अगदी थोडासा लिंबाचा रस त्यात मिसळायचा आहे. मग हे सगळं मिसळून एका खराब झालेल्या टूथब्रशच्या मदतीने तुमच्या भिंतीवरील डाग आपण काढू शकता. यासाठी लागणारी सगळी सामग्री ही अवघी १० रुपयांच्या खर्चात उपलब्ध होईल त्यामुळे हजारो रुपयांचे रंगाचे काम करण्यापेक्षा हा जुगाड नक्कीच पैसे वाचवणारा ठरू शकतो.
तुम्हाला हा जुगाड काम करेल का असा प्रश्न पडला असेल तर हा व्हिडीओ सुद्धा आवर्जून पाहा
हे ही वाचा<< १० हजार रुपये वाचवायचे तर चहाबरोबर गोड बिस्कीट खाणं आजच सोडा; ऍसिडिटीचा दातावर काय परिणाम होतो?
याशिवाय तुमच्या घरातील भिंती जर प्लास्टिक रंगांनी रंगवलेल्या असतील तर तुम्ही एखाद्या ओल्या कापडाने पुसून सुद्धा भिंतीचे डाग कमी करू शकता. येत्या दिवाळीच्या आधी हा जुगाड नक्की वापरून पाहा आणि त्याचा परिणाम चांगला होतोय का हे ही आम्हाला कळवा.