Rava Papad Recipe In Marathi: उन्हाळ्याचे दिवस सुरु होताच महाराष्ट्रात घरोघरी पापड, लोणची, मसाल्याची तयारी सुरु होते. खरंतर हे पदार्थ वर्षभरासाठी टिकतील एवढ्या प्रमाणात तयार करण्याची हौस सध्या कमी झाली आहे. तरीही लहानपणाची आठवण किंवा आवड म्हणून का होईना, किमान अर्धा, पाव किलोच्या प्रमाणात तरी हे पदार्थ केलेच जातात. आज सुद्धा आपण यातीलच एक वाळवणाची रेसिपी पाहणार आहोत. पापडाचं पीठ मळणं, कुटणं, लाट्या पाडणं व लाटून पुन्हा सुकवणं हे सगळे कष्ट वाचवण्यासाठी आपण अगदी कमी वेळात होणारे पळी पापड करून पाहू शकता. आज आपण रव्याचे पापड कसे करायचे हे पाहणार आहोत. अगदी १ कप रव्याचे प्रमाण घेऊन आपण रेसिपी पाहणार आहोत पण आपण आपल्या इच्छेनुसार प्रमाण कमी जास्त करू शकता. या पापडाची खासियत म्हणजे एकतर झटपट तयार होतात आणि सर्वात मुख्य म्हणजे जेव्हा तुम्ही हे पापड तळता तेव्हा ते अजिबात तेल शोषुन घेत नाहीत. चला तर मग, पाहूया कसे बनवायचे हे पळी पापड..

रव्याचे पळी पापड, साहित्य व कृती

साहित्य

१ वाटी रवा (बारीक)
१ चमचा मीठ
अर्धा चमचा पापड खार
७ ते ८ वाट्या पाणी
१ चमचा जिरे

Here Is How You Can Grow Your Eyebrows Faster and Thicker 10 tips
कमी खर्चात भुवया छान दाट व जाड करण्याचे १० सोपे उपाय; कसा वापर करायचा जाणून घ्या
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
hindu names of hijackers controversy
भावना दुखावून घेण्याची साथ आली आहे का? आयसी-८१४ वरील वाद हे त्याचंच लक्षण…
How When and Where to Watch Apple iPhone 16 Launch Event
Apple iPhone 16 Launch Event 2024 : आयफोन १६ ची किंमत किती असणार? वेळ, तारीख अन् कुठे बघता येईल लाइव्ह जाणून घ्या
Which finger should you get a glucometer test done on?
तुम्हालाही डायबिटीज आहे का? मग टेस्ट करताना कोणत्या बोटावर करायची? जाणून घ्या
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
Boiled Ajwain Water Benefits
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे; पाहा शरीरात कोणते बदल होतात? 
The many benefits and risks of consuming water soaked with coriander seeds
रात्रभर भिजवलेल्या धण्याचे पाणी प्यायल्याने छातीतील तीव्र जळजळ कमी होते का? तज्ज्ञांनी सांगितले फायदे आणि तोटे

कृती

  • रवा स्वच्छ चाळून निवडून घ्या. एक वाटी रव्यात एक वाटी पाणी घालून भिजवा.
  • रवा भिजेपर्यंत एका कढईत, रव्याच्याच मापाच्या वाटीतून सात वाट्या पाणी घाला.
  • या पाण्यात १ चमचाभर (चवीनुसार) मीठ व अर्धा चमचा पापड खार घालून मिसळून घ्या.
  • पाण्याला किंचित उकळी आली की भिजवलेला रवा त्यात ओतून नीट ढवळा.
  • गॅसची आच मंद करून मग यामध्ये चमचाभर जिरे टाका.
  • तुम्ही आवडीनुसार, काळीमिरी पावडर किंवा चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता.
  • साधारण घट्टसर मिश्रण आटल्यावर गॅस बंद करा.
  • एका कापडावर किंवा प्लास्टिकवर पळीच्या मदतीने पापड घाला.
  • दोन दिवस कडक उन्हात वाळल्यावर हे पापड थोडेसे पारदर्शक दिसू लागतील.
  • हवाबंद डब्यात पापड भरून ठेवू शकता, हवे तेव्हा हे तेल न शोषणारे व चौपट फुलणारे पापड तुम्ही तळून खाऊ शकता.

तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्ही वेगळ्या कोणत्या पद्धतीने असे वाळवणाचे पदार्थ करता का? तुमच्या रेसिपी सुद्धा वाचकांसह शेअर करण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा.