How To Peel Corns Faster Video: घर असो किंवा ऑफिस, पावसाळा आणि हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये छान वाफाळता उकडलेला कॉर्न किंवा भाजलेला भुट्टा अगदी सहज कुठेही मिळतो. पोट भरण्यासह, जिभेचे चोचले पुरवणारा आणि आरोग्याला असंख्य फायदे देणारा मका अनेकांना खायला आवडतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, मक्यामध्ये फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात, त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियम सारख्या आवश्यक खनिजांव्यतिरिक्त जीवनसत्त्वे ए, बी आणि सी देखील असतात. आहारतज्ज्ञ एकता सिंघवाल यांनी हेल्थशॉट्सला सांगितल्याप्रमाणे मक्याचे सेवन हे नैसर्गिक पद्धतीने करणेच हिताचे ठरूशकते . तुम्ही कॉर्न वाफवू शकता, भाजू शकता, ग्रिल करू शकता किंवा उकळू शकता, फक्त कॉर्न तळू नका अन्यथा पोषक तत्व टिकवून ठेवणे कठीण होईल.
आता आपण मका खाण्याचे फायदे व योग्य पद्धत याविषयी बोलतच आहोत तर एक आणखी गोष्ट नमूद करणे खूप महत्त्वाचे वाटते ती म्हणजे, कॉर्न सोलण्याची सोपी पद्धत कोणती? प्रक्रिया कोणतीही असो, मक्याचे दाणे वेगवेगळे सोलत बसणे हे कंटाळवाणे काम ठरू शकते, आज आपण युट्युबवरील एका प्रसिद्ध क्रिएटरने सांगितलेल्या दोन सोप्या ट्रिक पाहणार आहोत ज्याने अवघ्या चार- पाच मिनिटात आपण टोपभरून कॉर्नचे दाणे सोलू शकता. अशी ही हॅक काय आहे, चला पाहूया ..
@Maa Ye Kaisa Karun या युट्युब चॅनेलवरून शेअर केलेल्या टिप्स नुसार, मक्याच्या कणसाचे समान तुकडे करून घ्या. कणिस तोडल्यानंतर मक्याच्या दाण्यांची जी सगळ्यात वरची रेष आहे, तिथले दाणे अंगठ्याने पुढच्या बाजुला वाकवून घ्या. पटापट दाणे तुटतील. अशाप्रकारे एकेका ओळीतले दाणे सोलत जा. एवढा वेळ नसेल तर मग आपण थेट सुरीच्या मदतीने कणीस उभं धरून कापू शकता. वरचा दाणा थोडा वाकवल्याने अन्य दाणे ओळीत तुटतात व अर्धवट अडकून राहत नाहीत. तुम्हाला कबाब कटलेट बनवायचे असल्यास ही सूरी किंवा चमच्याची हॅक कमाल कामी येऊ शकते.
हे ही वाचा<< Video: १० मिनिटात पोह्याच्या मेदूवड्यांचे पीठ तयार; तेलाचा थेंबही न वापरता करा खमंग खुसखुशीत वडा- सांबार
एक प्रो टीप सांगायची म्हणजे, जेव्हा तुम्ही एखाद्या विक्रेत्याजवळ मक्याचे दाणे विकत घ्याल तेव्हा अधिक लोणी किंवा मिरची पावडर किंवा मीठ मागता ते टाळावे याउलट आपण नैसर्गनिक हर्ब्स आणि मसाल्यांचा वापर करू शकता. वर सांगितलेल्या पद्धतीने घरीच कणीस सोलून मक्याचे दाणे घरगुती पद्धतीने खात असाल तर मात्र तुमचा खर्च अर्ध्याहून कमी होऊ शकतो.