How To Clean Gas Burners Video: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गॅससमोर थोड्यावेळ उभं राहायचं झालं तरी जीवाची कशी लाही लाही होते हे काही वेगळं सांगायला नको. आता विचार करा, ज्या व्यक्तीवर घरातील चार वेळेचे जेवण बनवायची जबाबदारी असेल त्यांना किती त्रास होत असेल. तुम्ही स्वतः हे कष्ट घेत असाल किंवा तुमच्यासाठी तुमच्या प्रेमाची व्यक्ती हे कष्ट करत असेल तर आजची आपली ट्रिक तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते. अनेकदा होतं काय की, आपण शेगडीची स्वच्छता तर दोन दिवसाआड करतोच पण बर्नरकडे दुर्लक्ष होतं. वेळच्या वेळी स्वच्छ न केल्याने कार्बनचे कण बर्नरच्या छिद्रात अडकून त्यांना ब्लॉक करतात, यामुळे एकतर बर्नर काळवंडतो आणि दुसरं म्हणजे त्य्या छिद्रांतून नीट आच बाहेर पडतच नाही, परिणामी बर्नर अर्धवटच पेटतो. यामुळे भांड्यांना हवी तशी समान उष्णता मिळत नाही आणि जेवण शिजायला वेळ लागतो. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला गॅस बर्नरची स्वच्छता नीट करणं गरजेचं आहे. आज त्याचाच जुगाड आपण पाहणार आहोत.
@nature_touch या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये गॅस बर्नर स्वच्छ करण्यासाठी घरगुती उपाय सांगितला आहे. यासाठी आपल्याला चारच गोष्टींची आवश्यकता असेल.
१) कोमट पाणी
२) अर्ध्या लिंबाचा रस
३) बेकिंग सोडा/ इनो
४) चमचाभर मीठ
आपल्याला आता एवढंच करायचंय की गॅसचा बर्नर कोमट पाण्याच्या या द्रावणात काही तास भिजवून ठेवायचा आहे. शक्यतो एक ते चार तास बर्नर भिजवून ठेवल्यावर तुमच्या लक्षात येईल हळूहळू पाण्यामध्ये सगळं चिकटपणा उतरू लागेल. तुम्ही तारेच्या काथ्याने किंवा बेस्ट म्हणजे टूथब्रशने नीट घासून बर्नर स्वच्छ करू शकता. बर्नरच्या रंगापासून ते बंद पडलेल्या छिद्रांपर्यंत सगळा बदल तुम्हालाच समोर दिसेल. बेकिंग सोडा आणि लिंबाचे हे द्रावण सहसा खूप चिकट व घट्ट डाग काढण्यासाठी सर्वोत्तम सिद्ध होतं.
हे ही वाचा<< एका कलिंगडात दडलंय किती पोषण? डायबिटीस असो वा वजन कमी करण्याचं मिशन, किती व कसं खाल गोड कलिंगड?
तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.