How To Clean Gas Burners Video: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये गॅससमोर थोड्यावेळ उभं राहायचं झालं तरी जीवाची कशी लाही लाही होते हे काही वेगळं सांगायला नको. आता विचार करा, ज्या व्यक्तीवर घरातील चार वेळेचे जेवण बनवायची जबाबदारी असेल त्यांना किती त्रास होत असेल. तुम्ही स्वतः हे कष्ट घेत असाल किंवा तुमच्यासाठी तुमच्या प्रेमाची व्यक्ती हे कष्ट करत असेल तर आजची आपली ट्रिक तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची ठरू शकते. अनेकदा होतं काय की, आपण शेगडीची स्वच्छता तर दोन दिवसाआड करतोच पण बर्नरकडे दुर्लक्ष होतं. वेळच्या वेळी स्वच्छ न केल्याने कार्बनचे कण बर्नरच्या छिद्रात अडकून त्यांना ब्लॉक करतात, यामुळे एकतर बर्नर काळवंडतो आणि दुसरं म्हणजे त्य्या छिद्रांतून नीट आच बाहेर पडतच नाही, परिणामी बर्नर अर्धवटच पेटतो. यामुळे भांड्यांना हवी तशी समान उष्णता मिळत नाही आणि जेवण शिजायला वेळ लागतो. हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला गॅस बर्नरची स्वच्छता नीट करणं गरजेचं आहे. आज त्याचाच जुगाड आपण पाहणार आहोत.
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
Cleaning Gas Burners: अनेकदा होतं काय की, आपण शेगडीची स्वच्छता तर दोन दिवसाआड करतोच पण बर्नरकडे दुर्लक्ष होतं. वेळच्या वेळी स्वच्छ न केल्याने कार्बनचे कण बर्नरच्या छिद्रात अडकून त्यांना ब्लॉक करतात, ते कसे स्वच्छ करावे हे पाहूया..
Written by लाइफस्टाइल न्यूज डेस्क
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 05-04-2024 at 12:16 IST
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video 5 rupees lemon jugad how to clean gas burners at home so gas flame will be full fast reduce time of cooking in summer svs