शैक्षणिक व्हिडिओ मध्ये कॅप्शन म्हणजेच मथळे वापरल्याने विद्यार्थ्यांच्या शिकण्याला चालना मिळते व ते विषय लवकर आत्मसात करतात. तसेच त्यांच्या ग्रेडमध्ये सुधारणा होण्यास मदत होत असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे.
सॅन फ्रान्सिस्को विद्यापीठातील रॉबर्ट केथ यांना आढळून आले की, शैक्षणिक व्हिडिओमध्ये मथळेही वापरल्यास विद्यार्थ्यांच्या परिक्षेतील गुणांमध्ये वाढ होते. कारण या मथळ्यांमुळे विद्यार्थ्यांना विषयाचे आकलन कऱण्यास मदत होते.
यात दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात त्यांनी पहिल्यावर्षी विद्यार्थ्यांना मथळे नसलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून शिकविले.
त्यांनतरच्या वर्षी व्हिडिओच्या खाली मथळे वापरण्यास सुरूवात केली. यातून त्यांना फरक जाणवू लागला. विद्यार्थ्यांना विषय लवकर समजू लागला तसेच त्यावर घेतलेल्या सराव परिक्षातील गुणांमध्येही वाढ झालेली दिसुन आली.

Story img Loader