मुंबई शहर हे जगभरात प्रसिद्ध आहे. येथील जीवनशैलीबद्दल सर्वांनाच कौतुक आणि कुतूहल आहे. येथे अनेक जाती, धर्माचे लोक आनंदाने एकत्र राहतात. मुंबई प्रमाणेच मुंबईचा वडापाव देखील तितकाच लोकप्रिय आहे. जगभरातील लोकांना वडापावने वेड लावलं आहे. अनेक लोकांनी या पदार्थामध्ये अनेक बदल केले आहेत. याचे बरेच व्हर्जन आपण दररोज पाहतो. आता देशातील वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेला वडापाव आपण खाऊ शकतो.
वडापाव हा मुंबईकरांचा आवडीचा खाद्यपदार्थ आहे पण या वडापावची ख्याती फक्त मुंबई पुरतीच मर्यादित नाही तर संपूर्ण देशभर पसरली आहे. खानदेशातील जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यात एक असाच लोकप्रिय वडापाव आहे, घाशीलाल वडापाव. भुसावळची ओळख ही रेल्वे आणि दिपनगरमुळे असली तरी भुसावळच्या या वड्याची चव न्यारी आहे. भुसावळ शहराच्या मध्यभागी असणारा ‘घाशीलाल वडा’ हा पंचक्रोशी मध्ये खास आहे. काय आहे खानदेशच्या या वडापावची कहाणी, जाणून घेऊया या व्हिडीओच्या माध्यमातून.
कधी आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार? जाणून घ्या उपासनेची योग्य विधी
हा गरम गरम वडा खाण्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत नागरिकांची गर्दी असते. आज हे दुकान मूळ मालकाची पाचवी पिढी चालवत आहे. पाचवी पिढी आज हा कारभार सांभाळत असली तरीही या वड्याची चव मात्र बदललेली नाही. या ठिकाणी सळपासून सुरु झालेली भट्टी रात्री उशीरापर्यंत सुरू असते. आजही दुरून येणारी पाहुणेमंडळी एकदा तरी या ठिकाणी वड्याची चव घेण्यासाठी येतात.