How To Clean Burned Kadhai: तुम्ही काय खाता याचा तुमच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होतो पण तुम्ही खात असणारे जेवण कशात बनवता याचाही तुमच्या आरोग्यावर प्रभाव पडत असतो. एखाद्या आजारासाठी कोणते अन्नपदार्थ टाळावे अशा अनेक गोष्टींचा विचार जेवण बनवताना केला जातो. पण जेवण कशात बनवले जात आहे याचा विचार आपण करतो का? अलीकडे बहुतांश घरांमध्ये स्टेनलेस स्टीलची भांडी मोठ्या प्रमाणात वापरली जातात. स्टेनलेस स्टीलची भांडी दिसायला सुंदर व टिकाऊ तसेच स्वस्त असल्याने त्यांचा वापर वाढला आहे पण ही भांडी वापरणे अनेकदा टेन्शन वाढवते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

स्टेनलेस स्टीलमध्ये कमी तेल वापरून जेवण बनवणे कठीण असते अनेकदा तर आपण तेल वापरूनही भांड्याच्या तळाला भाजीचे मसाले, फोडणी चिकटू शकते. यासाठी आज आपण अगदी सोप्पे उपाय पाहणार आहोत. @chailovescoffee या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एका मास्टरशेफने स्टेनलेस स्टील न कारपवता व भाजी न चिकटवता जेवण बनवण्याचा एक मार्ग सांगितला आहे.

तुम्ही जेव्हा स्टेनलेस स्टीलमध्ये भाजी करत असाल तेव्हा त्यात बर्फाचा एक किंवा फार फार तर दोन क्यूब टाका. व ज्याप्रमाणे आपण भाजी परततो तसेच हे क्यूब सुद्धा विरघळेपर्यंत परतून घ्या. या आईसक्युबच्या मदतीने चिकटलेला थर निघून जाण्यास मदत होईल.

तुम्ही पाणी देखील घालू शकता पण अगदी किंचित पाणी सुद्धा पूर्ण आटायला वेळ लागतो यामुळे भाज्या अधिक मऊ पडतात. आईसक्युब वेगाने विरघळून त्याची वाफ होत असल्याने आपल्या भाजीवर काहीही परिणाम होत नाही. उलट मसाले चिकटण्याऐवजी भाजीत अधिक एकरूप होतात.

हे ही वाचा<< साडीवर तेलाचे डाग पडल्यास कसे काढावेत? पाणी चुकूनही वापरू नका उलट करा ‘हे’ उपाय

दरम्यान, एवढं सगळं करूनही अनावधानाने तुमच्याकडून स्टेनलेस स्टीलची भांडी करपली गेलीच तर त्यावर सोप्पा उपाय म्हणजे यात एक टिश्यू पेपर, थोडा भांडी घासायचे लिक्विड किंवा साबण तसेच पाणी घालून थोड्यावेळ बाजूला ठेवा. हा टिश्यू तो चिकट थर शोषून घेण्याचे काम करतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video how to clean burned kadhai when spices stick to the bottom what can be used instead of extra oil for crispy svs