How To Make Hair Spa Cream: स्त्री असो वा पुरुष आपले केस हे प्रत्येकालाच प्रिय असतात. केस गळती सुरु झाली की जे टेन्शन येतं ते शब्दात सांगण्यासारखं नाही. केस गळण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे केसाची निगा न राखणे आणि हो, निगा म्हणजे केवळ केस धुणे नाही. केस धुताना आपण वापरत असलेल्या शॅम्पू किंवा कंडिशनरमुळे अनेकदा केस रुक्ष होतात व मग विंचरताना किंवा नुसताच केसातून हात जरी फिरवला तरी सहज तुटून पडतात. त्यामुळे केसात मऊ पणा येण्यासाठी काम करणे आवश्यक आहे. यासाठी अनेक तज्ज्ञ हेअर स्पा घेण्याचा सल्ला देतात. हा सल्ला चुकीचा नसला तरी साहजिकच दर आठवड्याला परवडण्यासारखा नसतो. म्हणूनच आज आपण एक अशी ट्रिक बघणार आहोत ज्याने तुम्ही दर आठवड्याला हेअर स्पा करू शकता.
@beautywithfarhat या अकाउंटवर नुकतीच हेअर स्पा क्रीम घरी कशी बनवायची याची माहिती शेअर करण्यात आली आहे. यासाठी अवघ्या चार गोष्टी वापराव्या लागतील व त्यासुद्धा अगदी स्वस्त व नैसर्गिक आहेत. चला तर मग बघूया ही क्रीम कशी बनवायची..
हेअर स्पा क्रीम साहित्य (How To Make Hair Spa At Home)
- ४- ५ टीस्पून नारळाचे तेल
- ४- ५ टीस्पून कोरफडीचा गर
- २ व्हिटॅमिन ई कॅप्सूल
- १ टीस्पून ग्लिसरीन
या चारही गोष्टी एकत्र मिसळून त्याची छान पेस्ट होईपर्यंत ढवळून घ्या. मग तुमच्या केसाला मुळापासून ही क्रीम लावून चांगला मसाज करा. साधारण एक तास क्रीम केसावर राहूद्या व मग केस धुवून घ्या.
हे ही वाचा<< केस कापल्याने खरोखरच वाढतात का? तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं केसवाढीसाठी नेमकं काय करावं
अलीकडेचडॉ. जयश्री शरद यांनी आपल्या इंस्टाग्राम पोस्टमधून दिलेल्या माहितीनुसार, केसाच्या आरोग्यासाठी तुम्हाला उत्तम प्रथिने, अमिनो ऍसिड, व्हिटॅमिन व खनिजांनी समृद्ध आहार घ्यायला हवा. सर्वात मुख्य म्हणजे ताण- तणाव दूर ठेवा , ताणाचा सरळ प्रभाव तुमच्या टाळूवर होतो परिणामी केसाची वाढ सुद्धा खुंटते. अनेकदा तुमच्या हार्मोनल इम्बॅलन्समुळे सुद्धा केसाची लांबी वाढण्यास अडथळा येऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)