How To Reduce Burning After Cutting Chilies: मिरचीच्या बियांमध्ये आणि बाजूच्या थरांमध्ये अल्कलॉइड ऑइल कॅप्सेसिनमुळे तिखटपणा येतो. या घटकांना स्पर्श झाल्यास त्या अवयवाची जळजळ होऊ शकते. अनेकजण बरं वाटावं म्हणून मिरची कापून झाली की पाण्याखाली हात धरतात पण यामुळे ते तिखट तेल आणखी पसरत जाते. अशावेळी सर्वात सोपा मार्ग म्हणजे मिरची कापताना नेहमी ग्लोव्ह्ज घालणे हा एक चांगला नियम आहे, ग्लोव्ह्ज घालणे शक्य नसेल तर आपण हाताला निदान तेल लावावे जेणेकरून मिरचीचा तिखट थर हातावर टिकणार नाही. समजा तरी तुमच्याकडून अनावधानाने चूक झालीस तर हाताची जळजळ घालवण्यासाठी काही सोपे उपाय आपण आज पाहुयात..

दूध

दुधामुळे मिरचीचा तिखटपणा निघून जाण्यास मदत होते, त्यामुळेच समजा तुम्हाला तिखट खाल्ल्याने जिभेची जळजळ होत असेल तरी दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. हाताचा जाळ होत असल्यास वाडग्यात दुध घेऊन त्यात हात बुडवून ठेवा. थंड दूध घेतल्यास अधिक परिणामकारक ठरू शकतो.हाताला थंडावा जाणवला की थोड्यावेळाने थंड पाण्याने हात धुवून घ्या. याशिवाय आपण घट्ट दही सुद्धा लावून दाह थांबवू शकता.

Alum Cleaning Hacks
घरातील फरशी चकाचक करण्यासाठी तुरटी आहे अत्यंत फायदेशीर; जाणून घ्या सोप्या टिप्स
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Kartik Aaryan
डिओड्रंटचा वापर करून ‘या’ अभिनेत्याने जाळले होते बहिणीचे केस; आईनेच केला खुलासा
kitchen Jugad Tired of removing coconut
नारळाच्या शेंड्या काढून वैतागलात? ‘हा’ सोपा जुगाड एकदा वापरा अन् झटक्यात होईल काम
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय

तेल

शक्यतो मिरची चिरण्याआधीच हाताला थोडे तेल लावणे फायद्याचे ठरते पण असं न केल्यास आपण मिरची चिरून झाल्यावर हाताला राईचे तेल लावू शकता. मिरचीचा तिखटपणा पाण्यापेक्षा तेलांमध्ये जास्त विरघळतो त्यामुळे दाह दूर होण्यास मदत होते.

डिश वॉशिंग लिक्विड

भांडी घासायचे लिक्विड हे तिखटपणा व दाह दूर करण्यासाठी चटकन परिणामकारक ठरते. अनेकांना यामुळे मदत झाली आहे. पण शक्यतो हे लिक्विड वापरून हात धुतल्यावर हाताला नीट मॉइश्चरायजर लावायला विसरु नका.

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा आणि पाणी यांचे मिसळून एक पेस्ट बनवा जी आपल्याला हाताला लावायची आहे. पेस्ट जशी सुकायला लागेल तसा दाह कमी होण्यास मदत होईल.

स्टेनलेस स्टील

अनेक स्मार्ट गृहिणी सांगतात की, की जर तुम्ही स्टेनलेस स्टीलवर हात घासलात तर कांदा आणि लसूण सारख्या दुर्गंधीयुक्त पदार्थांचा वास निघून जाईल. त्याच प्रकारे, स्टेनलेस स्टीलमध्ये वेदनादायक दाह दूर करण्यासही मदत करू शकतो. स्टेनलेस स्टीलचे ताट किंवा वाटी फ्रीजमध्ये ठेवून मग हातावर फिरवल्यास दाह निवळण्यास मदत होते.

हे ही वाचा<< Video: सिलेंडर अचानक संपला की गोंधळून जाऊ नका! न घाबरता नवीन सिलेंडर जोडायच्या ‘या’ स्टेप्स पाहा

मिरची कापल्यावर हाताची जळजळ कशी घालवाल?

हे ही वाचा<< Video: भाताचा लगदाही नको,कच्चाही नको! मोकळा फडफडीत भात बनवायच्या ‘या’ १० बेस्ट टिप्स पाहा

तुमच्याकडेही अशाच काही सोप्या स्मार्ट टिप्स असतील तर कमेंट करून नक्की कळवा!