Video How To Wash Earthen Pots: भरउन्हाळ्यातही काही ठिकाणी सर्दी तापाच्या साथी पसरत आहेत. वारंवार बदलणाऱ्या वातावरणासह तुम्ही नियमित आयुष्यात करत असणाऱ्या काही चुका सुद्धा यामागे कारण ठरू शकतात. जसे की, हे तुम्ही करता का सांगा, उन्हाच्या वेळी तुम्हाला नेमकं बाहेर पडावं लागलं. तुम्ही नाईलाजाने जाऊन काम करून परत येता आणि मग घशाला पडलेली कोरड मिटवण्यासाठी छान माठातील थंडगार पाणी पिता. तुम्हाला तेवढ्यात बरं वाटत असेल पण याचा नंतर तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
आता इथे प्रश्न माठाचा आहे का? तर नाही. उलट तुम्ही माठ किती वेळा धुवून स्वच्छ करून भरता हे पाहणे महत्त्वाचे आहे. म्हणजे आपला समज असतो की, पाणी खूप वेळ ठेवल्यावर आणखी गार होते. त्यामुळे काही घरात माठ रिकामा होत आला की त्यात परत पाणी भरले जाते. पण तुम्ही एक लक्षात घ्या पाणी जरी जुने होत नसले तरी या माठाच्या तळाशी अंधारात काही जीवजंतू वाढू शकतात. तुम्हाला पटत नसेल तर हा व्हिडीओ स्वतःचं पाहा
त्यामुळे तुम्ही लाल, काळा कोणताही माठ घ्या पण ते रोज धुवून स्वच्छ करा, नीट झाकून ठेवा, घाणेरडे हात पाण्यात टाकू नका. जरी आपण झाकणाने झाकलेले असले तरीही माठ दररोज न धुतल्याने समस्या उद्भवू शकतात. माठ साध्या वाहत्या पाण्याने धुतला तरी हरकत नाही. शक्य असल्यास लिंबाच्या सालीने किंवा नारळाच्या किशीने माठ आतून बाहेरून घासून धुवून शकता. शक्यतो भांड्यांचा साबण किंवा काथ्या मातीच्या भांड्यावर वापरणे टाळावे.
हे ही वाचा<< वजन कमी करण्याचा वेग १० पट वाढवू शकतात ‘हे’ ५ शाकाहारी पदार्थ! वेगळा खर्च करायची गरज नाही फक्त…
दुसरं म्हणजे, बाहेरून उन्हातून आल्यावर लगेच माठातील थंड पाणी पिऊ नका. निदान मिनिटभर शांत बसून मग पाणी प्यावे. जेणेकरून शरीराचे तापमान बॅलन्स राहायला मदत होऊ शकते.