How To Kneed Aata Without Getting Hand Sticky: आपल्या सगळ्यांच्या घरात दिवसातून एकदा तरी पोळ्या बनवल्या जातात. या पोळ्या बनवून लगेच खाल्ल्या तर चवीलाही छान लागतात शिवाय तोडण्यासाठी दातांना व पचनासाठी पोटाला फार मेहनत घ्यावी लागत नाही. छान मऊ पोळ्या होण्यासाठी लाटण्याच्या, शेकण्याच्या सह पीठ मळण्याच्याही काही पद्धती तुम्ही लक्षात घ्यायला हव्यात. चपातीचे पीठ मळताना अनेकदा पाणी जास्त होऊ नये म्हणून आपण सुरुवातीला अगदीच कमी पाणी घेतो पण नंतर पीठ कोरडंच झालं म्हणून वरून पाणी ओतायला जातो, या सगळ्यात बहुतांशवेळा मोजमाप चुकून पीठ चिकट होतं. हे चिकट पीठ हाताला असं काही चिकटून राहतं की मग एक हात साफ करताना दुसरा हात आणि मग तो साफ करताना किचनमधील सगळे कपडे एकूण एक वस्तू खराब होऊ लागते. या सगळ्या सगळ्या त्रासांवर दोन भन्नाट जुगाड सध्या व्हायरल होत आहेत.

@momsgupshup आणि @MadhurasKitchen या दोन्ही चॅनेलवरून पीठ पाळण्याच्या काही सोप्या आयडिया सांगितल्या आहेत. त्या थोडक्यात आपण आता समजून घेऊया. पहिल्या चॅनेलवर सांगितल्यानुसार तुम्हाला पीठ मळताना अगदीच मॉडर्न पर्याय वापरता येऊ शकतो. थेट एका मिक्सरच्या भांड्यात आवश्यक तेवढं पीठ, मीठ आणि पाणी घालून तुम्ही चक्क मिक्सरला पीठ मळून घेऊ शकता. गरजेनुसार यामध्ये काही थेंब तेल सुद्धा मिसळता येईल. पाणी हळू हळू व कमी प्रमाणातच टाका नाहीतरी पिठाची अक्षरशः पेस्ट होऊ शकते. यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष पीठ मळताना हात वापरतच नसल्याने हात चिकट व्हायचा प्रश्नच येत नाही.

cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
raha kapoor and ranbir kapoor cute video viral
“Get Up Papa…”, राहाचे बोबडे बोल ऐकलेत का? धावताना धडपडली अन् बाबाजवळ जाऊन…; पाहा रणबीर-राहाचा गोड व्हिडीओ
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Viral video of a song sung by a school girl is currently going viral on social media
VIDEO: “कितीदा नव्याने तुला आठवावे…” शाळकरी विद्यार्थीनीचा आवाज ऐकून शिक्षकही झाले थक्क; सूर असा की अंगावर येतील शहारे
if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स

तर दुसरा उपाय म्हणजे तुम्ही पीठ मळण्यासाठी लाकडी पळी किंवा डावाचा वापर करू शकता. जेणेकरून हाताला पीठ चिकटत नाही. हे दोन्ही उपाय व्हिडीओसहित सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने हे खरोखरच कामी येऊ शकतात असे म्हणायला हरकत नाही.

Video: पीठ मळताना हात चिकट न करता झटक्यात काम करा पूर्ण

हे ही वाचा<< एक दिवस शिळ्या भातात जे दिसलं ते पाहून धडकीच भरेल; चुकूनही करू नका ‘अशी’ चूक, एक कणही…

याशिवाय आपणही सुरुवातीला कमी प्रमाणात हा प्रयोग करून पाहू शकता. यामुळे तुमचा किचनमधील वेळ, कष्ट व चिडचिड सगळं कमी होण्यास मोठी मदत होऊ शकते. कशी वाटली ही कल्पना? आम्हाला कळवायला विसरू नका.

Story img Loader