Jugaad To Dry Clothes: अलिकडे पावसाळा सुरूच आहे. दरम्यान, ढगाळ वातावरण आणि जास्त ऊन नसते. त्यामुळे हवेत ओलावा असतो आणि माणसांच्या अंगावर घाम खूप येतो. त्यामुळे कपड्यांचा वास येतो. तसेच धुतलेले कपडे व्यवस्थित वाळत नाहीत. अशावेळी, अनेक जण घरच्या पंख्याच्या मदतीने कपडे वाळवतात. मात्र, त्याचा दुर्गंध काही जात नाही. यामुळे माणसांची चिडचिड वाढते. हे सर्व हेक्टिक वाटते. मित्रांनो, आपण ऋतू बदलवू शकत नाही. मात्र, यावर घरगुती जुगाड करून कपड्यांच्या दुर्गंधी आणि कपडे वाळवण्याची सोपी पध्दत आम्ही तुमच्यासाठी हुडकून काढलीय, ज्यामुळे ओले कपडे काही मिनिटांत वाळवता येतील. पाहा मग ‘ही’ साधी सोपी ट्रिक्स…

सर्वप्रथम जाणून घेऊया पावसात कपड्यांना दुर्गंधी का येते?

पावसाळा या ऋतूत तुम्ही कितीही वेळा कपडे धुतले तरी त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही आणि ओलावा राहतो. त्यामुळे कपड्यांमध्ये बॅक्टेरिया आणि फंगस वाढू लागतात आणि कपड्यांना दुर्गंधी येते. काळजी करू नका, खालील ट्रिक्स तुमची समस्या दूर करेल.

if you sneeze frequently try these things and get benefits
Video : वारंवार शिंका येतात? हे खालील उपाय करून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mom Dress up the dog with a hat and sweater
थंडीपासून संरक्षणासाठी जबरदस्त जुगाड! श्वानाला कानटोपी, स्वेटर घालून केले तयार; पाहा मजेशीर VIDEO
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
what is marriage a child told funny answer
Video : “लग्न म्हणजे काय?” चिमुकल्याने स्पष्टच सांगितले, “घोड्यावर बसून केलेला गाढवपणा” मजेशीर व्हिडीओ होतोय व्हायरल
Unique way to remove peel garlic The Best Way to Easily Peel Garlic
महिलांनो हातही न लावता झटपट सोला लसूण; किलोभर लसूणही मिनिटांत होईल सोलून; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Savlyachi Janu Savli
Video: ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेतील कलाकारांचा ‘कोंबडी पळाली’ गाण्यावर भन्नाट डान्स; नेटकरी म्हणाले, “तुम्ही किती…”
do you ever see a monkey flying a kite
Video : माकडाला कधी पतंग उडवताना पाहिले का? व्हिडीओ एकदा पाहाच

पंखा नव्हे तर लसूणाने वाळवा कपडे

साधारणपणे, पावसात कपडे वाळवायचं म्हटलं की आपण पंख्याची मदत घेतोच. घरात स्टँड लावून त्यावर कपडे टाकून ते पंख्याच्या हवेवर वाळवतो. पण पंख्याशिवायही तुम्ही कपडे वाळवू शकता, तेसुद्धा लसूणाच्या मदतीने आता लसूणाने कपडे कसे काय वाळणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग पाहुयात सोशल मिडीयावर व्हायरल झालेला ‘हा’ व्हिडीओ….

(हे ही वाचा : Kitchen Jugaad: फ्रिजमध्ये दहा मिनिटे चष्मा ठेवून पहा, परिणाम पाहून विश्वास बसणार नाही!)

व्हिडीओच्या माहितीनुसार…

या व्हिडीओमध्ये एका महिलेने त्यावर घरगुती उपाय सांगितला आहे. तिने सांगितल्यानुसार हे कपडे पूर्णपणे सुकलेले नाहीत, थोडे ओले, दमट आहेत. आता तुम्हाला करायचं काय आहे तर सर्वप्रथम, लसूणाच्या साली घेऊन त्या तव्यावर गरम करून घ्यायच्या आहेत. आता एक कपडा घ्या, तो जमिनीवर पसरून घ्या आणि त्यावर लसूणाच्या साली पसरवा. त्यावर दुसरा कपडा ठेवा त्यावर साली पसरवा. असं करत करत सर्व कपडे एकावर एक ठेवून त्यावर लसूणाच्या साली पसरवा. लसणीच्या गरम साली कपड्यातील ओलावा, दमटपणा खेचून घेतो. त्यामुळे पावसाळ्यात ओले, दमट राहिलेले कपडेही नीट सुकतात, असा दावा या गृहिणीने केला आहे.

लसूण बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी गुणकारी

पावसाळ्यामध्ये वातावरणात ओलावा असल्यामुळे कपड्यांमध्ये बॅक्टेरिया आणि फंगस वाढू लागतात. त्यामुळे बॅक्टेरियाचे संक्रमण रोखण्यासाठीही लसणाची मदत होते. यामध्ये असलेले अँटीव्हायरल, अँटी-फंगल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आहेत, जे बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनपासून संरक्षण करतात.

पाहा व्हिडीओ

Ankitanoop युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओनुसार तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला देखील याचा नक्की फायदा होऊ शकतो.

(सुचना – ही माहिती सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. ‘लोकसत्ता’या व्हिडीओची पुष्टी करत नाही.)

Story img Loader