Brass Copper Puja Vastu Cleaning Tips Video: गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या एका आठवड्यावर आले आहे. तुमच्या घरीही बाप्पा येणार असतील तर तुम्हीही तयारी सुरु केली असेलच. पूजेची भांडी म्हणजेच दिवे, समई, ताम्हण इत्यादी वस्तू आता कपाटातून बाहेर काढायची वेळ आली आहे. आपण एकदा वापरल्यानंतर पुन्हा ही भांडी स्टोअर करून ठेवताना नक्कीच धुवून ठेवतो पण हवेतील काही घटकांमुळे या वस्तू काळवंडतात. अशावेळी तुम्ही जेव्हा पुन्हा भांडी वापरासाठी बाहेर काढता तेव्हा ती घासण्याला पर्याय नसतो. पण आज आपण अशा काही सोप्या टिप्स पाहणार आहोत ज्याने आपण फार घासाघीस न करता तुमच्याकडील तांब्या पितळेची भांडी लख्ख चमचमती करू शकता. फार वेळ न घालवता चला तर आपल्या आजच्या टिप्सकडे वळूया ..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तांब्याची भांडी स्वच्छ करण्यासाठी काय गोष्टी लागतात?

3 चमचे बेसन
1 चमचा मीठ
3 चमचे दही
1 चमचा हळद .
2 चमचे लिंबाचा रस

पेस्ट होईपर्यंत सर्व साहित्य चांगले मिसळा.

कृती:

थोड्या प्रमाणात पेस्ट घ्या आणि तुम्हाला स्वच्छ करायच्या असलेल्या तांब्याच्या उत्पादनांवर घासून घ्या.. तांब्याच्या वस्तू पेस्टने हळूवारपणे घासण्यासाठी मऊ कापड किंवा सौम्य ब्रश वापरा. डाग हळूहळू नरमतील. कोणतेही क्लिनिंग एजंट वापरताना सावधगिरी म्हणून तांब्याच्या वस्तूच्या संपूर्ण पृष्ठभागावर लावण्यापूर्वी थोड्या भागावर लावून बघा आणि मग पूर्ण भांड्यावर लावा. अगदी गरज लागल्यास टूथब्रशने भांडं घासून स्वच्छ करा आणि मग मऊ कपड्याने पुसून काढा व मग पाण्याखाली धुवून घ्या. सूर्यप्रकाशात भांडी वाळवणे उत्तमच.

हे ही वाचा<< ऑफिसमध्ये बॉस व घरी काम, सतत वाढतोय रक्तदाब? तुमच्या चिडचिडीमागे ‘हा’ आजार तर नाहीये ना कारण, वाचा

दरम्यान, याशिवाय आपण आम्लयुक्त गोष्टी जसे की, लिंबू, कोकम, टोमॅटो यासारखे पदार्थ भांड्यावर घासून सुद्धा डाग काढू शकता.