Video How To Get Rid Of Ants: पावसाळ्याचा आस्वाद घेताना प्रत्येक घरात दोन गोष्टी मात्र सतत सतावत असतात त्या म्हणजे कपडे कसे सुकवायचे व घरात येणाऱ्या किड्या-मुंग्यांवर काय उपाय करायचा? पावसाळा म्हटला की तळमजला व चाळीतल्या घरांमध्ये अगदी भयंकर किड्यांचा त्रास वाढतो तुलनेने पहिल्या माळ्यावर व त्याहून वर राहणाऱ्यांना घोण, गांडूळ, गोम यांचे त्रास कमी सहन करावे लागतात. पण मुंग्या मात्र असा कोणताच भेदभाव करत नाहीत. जरा कुठे गोडाचं किंवा उघड्यावर काही खायचं ठेवलं की काळ्या- लाल मुंग्या तिथे पिंगा घालायला हजर असतात. काही वेळा तर जेवणाच्या भांड्यांच्या चिकट डागांवर सुद्धा डोंगळे फिरत असतात. या सगळ्यामुळे अस्वच्छता व रोगांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच आज आपण या मुंग्यांना घराबाहेर कसं काढायचं याचा उपाय पाहणार आहोत. अवघ्या १० रुपयात तुम्ही हा पूर्ण उपाय करून पाहू शकता.
@Madhuris creative world या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कागद वापरून मुंग्यांना घराबाहेर काढण्याचे तीन भन्नाट मार्ग सांगितले आहेत. चला तर पाहूया…
तुम्हाला पेपरसह कापूर (पूड करून), मीठ, पाणी, साबण आवश्यक आहे. छोट्या वाटीत कापूराची पूड घ्या, त्यात मीठ व साबण टाकून थोडं पाणी घालून ढवळून घ्या. हे सर्व मिश्रण नीट एकत्र झाल्यावर आता हे सोल्युशन तुम्ही तीन पद्धतीने वापरू शकता.
एक पद्धत म्हणजे तुम्ही एका बाटलीत हे सोल्युशन घेऊन मुंग्या येणाऱ्या ठिकाणी स्प्रे करू शकता. एका फडक्याने हे लिक्विड टाकून लादी पुसून घेऊ शकता. किंवा एखादा जाडसर कागदच या लिक्विडमध्ये भिजवून मग ज्या ठिकाणी मुंग्यांचा वावर अधिक असतो तिथे ठेवू शकता जेणेकरून फक्त लिक्विड सुकेपर्यंतच नाही तर दीर्घकाळ तुम्हाला मुंग्यांपासून सुटका मिळू शकते.
दरम्यान, ही प्रक्रिया करताना हातात ग्लोव्ह्ज घाला जेणेकरून त्वचा सुरक्षित राहू शकेल. यातील बहुतांश वस्तू हा घरात असल्यानेच तुम्हाला वेगळा खर्च करण्याची गरज भासणार नाही.
हे ही वाचा<< २ रुपयांच्या मेणबत्तीने घरातील नळांची ‘ही’ समस्या करा दूर! पावसाळ्यात होईल खूपच मदत, पाहा Video
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे, आम्ही याचा दावा करत नाही)