Insect Repellent Coffee: घराची स्वच्छता कितीही काटेकोरपणे केली तरी काही न बोलावलेले पाहुणे आपला पिच्छा सोडत नाहीतच. उदाहरणार्थ, माशा, डास, कीटक इत्यादी. या पाहुण्यांना हाकलण्यासाठी बाजारात अनेक प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. पण कधी त्यांच्या धुरामुळे, कधी अत्यंत उग्र वासामुळे तर कधी चिकटपणामुळे आपले अन्यच त्रास वाढू लागतात. अशा वेळी तुमची समस्या सोडवण्यासाठी घरगुती उपाय करणे हाच उत्तम पर्याय ठरतो. आज सुद्धा आपण घरच्या घरी २ रुपयांची कॉफी वापरून कशाप्रकारे किड्यांना घरातून हाकलता येईल व पुन्हा ते येऊ नयेत याची सोय करता येईल हे पाहणार आहोत.
इंस्टाग्रामवर @masteringhacks या अकाउंटवर शेअर करण्यात आलेला एक सोपा जुगाड करण्यासाठी तुम्हाला २ रुपयांच्या कॉफीच्या पॅकेटमध्ये येते तेवढी कॉफी पावडर, अगदी वाटाण्याच्या आकाराएवढी टूथपेस्ट आणि एक ते टिश्यू पेपर लागणार आहेत. तुम्हाला काय करायचंय हे स्टेप्सनुसार जाणून घ्या.
१) सर्वात आधी एका वाटीत कॉफी ओतून घ्या
२) या मध्ये वाटाण्याच्या आकाराएवढी टूथपेस्ट घाला. शक्यतो कोणताही फ्लेव्हर नसलेली टूथपेस्ट उत्तम पण अगदीच नाही तर तुम्ही मिंट म्हणजेच पुदिन्याच्या फ्लेव्हरची पेस्ट वापरू शकता.
३) एखाद्या काडीच्या किंवा बोटाच्या मदतीने ही पेस्ट एकत्र करा.
४) टिश्यू पेपरची सुरळी करा व त्यावर ही पेस्ट नीट लावून घ्या.
५) यानंतर सुरळीत पूर्णपणे कॉफी व पेस्टचा अर्क उतरला की मग एका ग्लासात ही सुरळी ठेवून तिला अगरबत्तीसारखे प्रज्वलित करा.
हे ही वाचा<< भांडी घासायचा काथ्या सूरी व कात्रीला करेल क्षणात धारदार! काळजीपूर्वक वापरा हा जुगाड, पाहा Video
कॉफी व टूथपेस्टच्या या मिश्रणाची सुगंधित अगरबत्ती वापरून घरातील कीटक व किड्यांवर कायमचा उपाय करता येतोय का? याचा तुम्हाला किती फायदा होतोय हे कमेंट करून नक्की कळवा.