How To Dry Inner Wear With Comb: पावसाळा म्हटला की घरभर ओलावा व दमट वातावरण असतं आणि यामुळे काही दिवसातच घराला कुबट वास येऊ लागतो. लाकडी फर्निचरला बुरशी येऊ लागते. हा पावसाळा घराचं आणि खिशाचं पार दिवाळं काढतो असं म्हणायला हरकत नाही. पावसाळ्याचा आणखी एक त्रास म्हणजे ओले कपडे. अगदी रोजचे धुतलेले कपडे सुद्धा वाळायला वेळ लागतो. अशावेळी सगळ्यात मोठी समस्या असते ती अंतर्वस्त्र कशी वाळवायची, कारण एरवी कुर्ते, शर्ट, पॅन्ट या कपड्यांना हॉलमध्ये, बाल्कनीत टेबल, खुर्ची, दारं- खिडक्यांवर सहज वाळत घालता येतं पण अंतर्वस्त्रांच्या बाबत थोडा संकोच वाटू शकतो. विशेषतः जर घरी कोणी पाहुणे येणार असतील तर आणखीनच! यावर आज आपण टाकाऊतून टिकाऊ भन्नाट जुगाड पाहणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अगदी घरात पडून असलेला एखादा कंगवा आणि जाडसर दोरा घेऊन तुम्हाला हा जुगाड करता येईल. बहुतांश घरात या वस्तू अगोदरच असल्याने नव्यानं एक रुपयाही खर्च करायची गरज भासणार नाही.

१) खालील व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टोक बोथट झालेला किंवा थोडा जुनाट असा कंगवा तुम्ही घेऊ शकता.
२) तुम्हाला जितके कपडे वाळवायचे आहेत तितक्या कपडे सुकत घालायच्या क्लिप्स घ्या. आता क्लिपला असलेल्या होलमधून दोरा घालून गाठ बांधून घ्या.
३) सगळ्या क्लिप्सना दोरे बांधल्यावर आता एक एक करून कंगव्याच्या खाचांमध्ये हे दोरे अडकवा.
४) दोन्ही बाजूने अडकवण्यासाठी कंगव्याला सुद्धा दोरा बांधून घ्या.
५) घरातील एखाद्या खिळ्याला मग हा कंगवा अडकवून खाली लावलेल्या क्लिप्सना तुम्ही अंतर्वस्त्रं अडकवू शकता. हवेशीर ठिकाणी तुम्ही कंगवा अडकवून ठेवू शकता. अचानक कोणी घरी येत असल्यास फक्त कंगवा काढून तुम्हाला अन्य ठिकाणी लावता येईल.

कंगवा वापरून सुकवा कपडे

हे ही वाचा<< साधा कागद वापरून घरातील मुंग्या- डोंगळ्यांना करा गायब! १० रुपयात होईल काम पूर्ण, पाहा Video

@Smart Homely Ladyया युट्युब अकाऊंटवर हा जुगाड शेअर करण्यात आला असून अनेक गृहिणींना ही हॅक खूप आवडल्याने कमेंटमधून कळत आहे. तुम्हीही हा उपाय ट्राय करून पाहू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video jugaad use comb to dry under wear inner wears and small clothes in rainy season save all the trouble and money svs