Neeta Ambani Inspired Hair Style Video: मुकेश अंबानी यांचा पुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा प्री वेडिंग सोहळा हा अजूनही जगभरात चर्चेत आहे. राधिकाच्या ‘जय श्री कृष्णा’ च्या रीलपासून ते नीता अंबानी यांच्या साडीवरील विशेष संदेशापर्यंत अनेक गोष्टी सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहेत. नीता अंबानी यांचा प्रत्येक लुक हा या प्री वेडिंग सोहळ्यातील हायलाईट ठरला होता पण कॉकटेल पार्टी लुकसाठी नीता यांनी घातलेला मरून रंगाचा गाऊन अनेकांना भुरळ पाडून गेला. साहजिकच या गाऊनची किंमत थोडीथोडकी नव्हती पण त्याहीपेक्षा लक्षवेधी ठरली ती म्हणजे नीता अंबानी यांची अगदी साधीच पण देखणी अशी फ्रेंच बन हेअर स्टाईल. हा बन सेलिब्रिटी हेअर स्टायलिस्ट अमित ठाकूर याने केला होता. नीता अंबानी यांच्या तयारीच्या दरम्यानचा एक रील सुद्धा अमितने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. आज आपण अन्य एका हेअर स्टायलिस्टकडून हाच बन फक्त दोन रुपये खर्चात तुम्हीही तुमच्या केसावर कसा करून पाहू शकता हे बघणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मनवीन कौर यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर नीता अंबानी यांच्या हेअर स्टाईलचं सोपं साधं व सर्वात महत्त्वाचं सुंदर स्वस्त व्हर्जन दाखवणारी रील शेअर केली आहे. नीता अंबानींची हेअर स्टाईल करायला तर २०० कोटी लागतील पण हा बन तुम्ही फक्त दोन रुपयात स्टाईल करू शकता असं मजेशीर कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये त्यांनी फ्रेंच बनची संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.

१) सगळ्यात आधी केसाचे तीन चतुर्थांश भाग करून घ्या. तुमचे केस अगदीच लहान असतील तर मध्यम लांबीचे गंगावण सुद्धा वापरू शकता.
२) यातील एक भाग पुढच्या बाजूला करून घ्या.
३) मागील भागाची एक वेणी घालून ती वरच्या बाजूने दुमडत न्या. पूर्ण दुमडल्यावर हेअर पिनने नीट घट्ट बसवा.
४) उजवीकडचे केस थोडे आडवे पसरवून त्या वेणीच्या खोप्यावरून पिन करून घ्या. उरलेल्या केसाची सुद्धा वेणी घालून ती आपल्या बनच्या वर फिरवून घ्या.
५) आपला फ्रेंच बन तयार आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पुढील बाजूने थोडा पफ काढून डाव्या किंवा उजव्या बाजूने केस फिरवून घेऊ शकता, बनवर मग फुल किंवा चमचमणाऱ्या टिकल्या लावून सजवू शकता.

हे ही वाचा<< नीता अंबानींचा हेअर स्टायलिस्ट सांगतोय, रुपया खर्च न करता केस तुटणं कसं थांबवाल? केस धुतल्यावर व झोपताना फक्त..

अगदी साध्या साडीला सुद्धा शोभेल आणि पार्टी लुक देईल अशी ही हेअर स्टाईल आपणही नक्की करून पाहा, आणि हो तुम्हाला ट्रिक कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video nita ambani french bun hair style in just two minutes and two rupees for medium to short long hair length sadi look svs