Ambyachya Panache Toran: गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर येणारा हा सण आनंद, चैतन्य व समृद्धीचे प्रतिक मानला जातो. या दिवशी पहाटे उठतात आणि स्नान करून सूर्योदय झाल्यानंतर शुभ मुहूर्तावर गुढी उभारतात. अंगणात सुंदर रांगोळी काढतात. घर सुंदर फुलांनी व दिव्यांनी सजवतात. घरात श्रीखंड पुरी, पुरणपोळी इत्यादी प्रकारचे गोडधोड बनवले जाते. या दिवशी घराच्या दारात आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते.

गुढीपाडव्याच्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण दारात बांधणे, ही एक जुनी परंपरा आहे. पण अनेकांना तोरण कसे बनवायचे, याविषयी माहिती नाही. पण सध्या सोशल मीडियावर गुढीपाडव्यानिमित्त अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. असाच एका व्हिडीओमध्ये आकर्षक व सोपी असे आंब्याच्या पानांचे तोरण कसे बनवायचे, याविषयी सांगितले आहे.

दहा मिनिटात असे बनवा आंब्याच्या पानांचे सुंदर तोरण

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक महिला आंब्याच्या पानांचे तोरण कसे बनवायचे, याविषयी सांगते. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल आंब्याची पानं दिसेल. या आंब्याच्या पानांवर ही महिला शुभ, लाभ लिहिताना दिसत आहे. स्वास्तिक आणि ओम रेखाटताना दिसत आहे. त्यानंतर ही महिला हे सजवलेले आंब्याचे पानं एका दोरीत टाकत तोरण बनवताना दिसत आहे. ती एक आंब्याचे पान आणि एक झेंडूचे फुल अशा क्रमाने तोरण बनवते. हे तोरण बनवायला अतिशय सोपी आहे व तितकेच आकर्षक दिसत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

ar.unnatiagrawal या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “गुढीपाडवा आंब्याच्या पानांचे तोरण”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी असे तोरण करून बघणार” काही युजर्सनी कोणते रंग वापरले, असे विचारले आहे. काही युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. जवळपास एक लाख लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांना असे व्हिडीओ खूप आवडतात. अनेक युजर्स अशा व्हिडीओंना अधिक पसंती देतात.