Viral Video : चहा हा आपल्यापैकी प्रत्येकाला आवडतो. कडक गरमागरम चहाने आपल्या देशात दिवसाची सुरूवात होते. काही लोकांना चहा एवढा प्रिय आहेत की ते दिवसातून तीन चार वेळा घेतात. काही लोक टेन्शनवरचं औषध म्हणून चहा घेतात. चहा खरं तर प्रत्येक जण त्याच्या आवडीप्रमाणे बनवतो. भारतात प्रत्येक राज्यात तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा चहाचा स्वाद मिळेल पण अनेकदा काही छोट्या मोठ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने मनाप्रमाणे चहा तयार होत नाही. आज आपण परफेक्ट चहा कसा बनवावा, याविषयी जाणून घेणार आहोत. सध्या एक युट्युबवर व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चहा बनवताना लक्षात ठेवाव्यात अशा महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.
फक्कड चहा बनवायचा?
या व्हायरल व्हिडीओमध्ये भरत नावाचा तरुण सांगतो, “आपला देश असा आहे जिथे प्रत्येकाला चहा खूप आवडतो आणि प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने चहा बनवला जातो. चहा बनवताना तुम्ही अनेकदा निरीक्षण केले असेल की नेहमी चहा मनाप्रमाणे बनत नाही. म्हणजे प्रत्येकवेळी एक सारखा स्वाद येत नाही. पण आज आम्ही तुम्हाला प्रत्येकवेळी एक सारखा स्वाद मिळवता येईल अशी चहाची रेसिपी सांगणार आहोत.”
पुढे व्हिडीओ चहाची रेसिपी सांगितली आहे.
चहा बनवताना नेहमी फ्रिजमधून एक कप दूध बाहेर काढून ठेवावे.
मसाला चहाच्या रेसिपीमध्ये फ्लेवर खूप महत्त्वाचा आहे
तीन कप चहासाठी दोन वेलचीचा वापर करावा आणि दोन इंच आलं बारीक करून घ्यावे.
जर तुम्ही उन्हाळ्यात चहा बनवत असाल तर तुम्ही चहामध्ये बडीशेप टाकू शकता. बडीशेप पोटाला थंड ठेवते
जर तुम्ही हा चहा हिवाळ्यात बनवत असाल तर काळी मिरी किंवा केसर टाकावे.
मोठ्या आचेवर चहाचे पातेले ठेवावे. त्यात ३ कप पाणी टाका.
पाण्याला उकळी आली.
त्यात लवंग, आलं आणि वेलची टाका.
पाण्याचा रंग थोडा बदलेल,
त्यानंतर त्यात चहा पावडर टाका चहा पावडर सह साखर टाका
तीन मिनिट पर्यंत कमी आचेवर चहा उकळू द्या
त्यानंतर त्यात एक कप दूध घ्या.
दूध यासाठी आधी टाकावे कारण फ्रिजमधील थंड दूध टाकले तर तापमानात बदल दिसेल आणि चहाचा स्वाद बिघडेल.
१ मिनिट पर्यंत चहा चांगला उकळून घ्या. त्यानंतर चहा कपमध्ये गाळून घ्या.
शेवटी चहा सर्व्ह करताना चहावर दालचिनी आणि वेलची पावडर टाका. यामुळे चहाला खूप चांगला स्वाद येतो.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
bharatzkitchen या युट्युब अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “चहा बनवताना या चार गोष्टी नेहमी लक्षात ठेवाल तर तुमच्या चहाचा स्वाद आणखी वाढणार.