Weight Loss Secret : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही अशात बिघडलेल्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन वाढत आहे. वाढलेले वजन कसे कमी करावे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो पण अनेक उपाय करूनही वजन कमी होत नाही. पण टेन्शन घेऊ नका, आज आपण वजन कसे कमी करावे आणि त्यासाठी कोणते पदार्थ खावे, हे जाणून घेणार आहोत.
महिलासाठी केटो कोच असलेल्या ब्रेना बट्सने इन्स्टाग्रामवर पाच प्रकारच्या पदार्थांविषयी सांगितले आहेत ज्याच्या मदतीने तिने २० किलो वजन कमी केले आहे. तिचे वजन ८६ किलो होते, आता तिचे वज ६६ किलो आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की तिने आहारात घेतलेले ते पाच पदार्थ कोणते आहेत? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
पाहा व्हिडीओ (Viral Video)
ketocoachbre या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचे हजारो फॉलोअर्स आहेत जे तिला फॉलो करतात आणि तिच्या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात. तिने २० किलो वजन कसे कमी केले हे सर्वजण तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
वजन कमी करण्यासाठी तिने खालील पाच पदार्थ खाल्ले
तिने नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणात समावेश करता येईल असे पाच पदार्थ सांगितले आहे. . चिया सारख्या सुपरसीड्सपासून ते ताजेतवाने फळांच्या स्मूदीपर्यंत, हे पाच पदार्थ वजन कमी करण्यास फायदेशीर ठरतात आणि शरीराला पोषक तत्वे पुरवतात.
१.टाको बाउल्स (Taco bowls) – हा एक मेक्सिकन पदार्थ आहे.
२. अंड्यापासून बनवलेले छोटे व चवदार स्नॅक्स (Egg bites)
३. तेरियाकी चिकन(Teriyaki chicken)
४. चिया सीड्स पुडिंग (Chia seed pudding)
५. अॅव्होकॅडो स्मूदी (Avocado smoothie)
या पाच पदार्थांचा आहारात समावेश करून वजन कमी करता येते.
सेलिब्रिटी सुद्धा आहारात घेतात हे पदार्थ
कतरिना कैफ आणि विराट कोहली सारखे दिग्गज सेलिब्रिटी सुद्धा अशाच दिनचर्येचे पालन करतात. कतरिना कैफ घरगुती जेवण करते. आणि दिवसातून दोनदा जेवण करते.
निरोगी जीवनशैली स्वीकारून नियमित व्यायाम केल्याने आणि पोषक तत्वांनी भरलेला आहार घेतल्याने वजन कमी करण्यास मदत होते.