श्रावण महिना सुरू झाला की एका पाठोपाठ एक सण सुरू होतात. प्रथम श्रावणी सोमवार आले, त्या पाठोपाठ, कृष्णजन्माष्टमी, हरितालिका, त्यानंतर गौरी गणपती हे सण उत्साहात पार पडले. सध्या पितृपक्ष सुरु आहे. पितृपक्ष संपताच नवरात्रोत्सव सुरु होईल. घटस्थापना केली जाईल त्यानंतर लगेच दिवाळी. सणवाराचे दिवस म्हणजे साफसफाई हवीच. गौरी गणपतीच्या आगमापूर्वीच तशी घराची साफसफाई झालेली असते पण तांबे-पितळीची भांडी पुजा विधीसाठी वारंवार वापरली जातात, त्यांची वारंवार साफसफाई करणे अवघड असते. बाजारात अनेक उत्पादने मिळतात पण हे तांबे-पितळीची भांड्यांची घासण्याची पावडर आता तुम्ही घरीच तयार करू शकता. स्वयंपाकघरातील पदार्थ वापरून तुम्ही ही भांडी साफ करण्याची पावर घरीच तयार करू शकता. करू शकता चला चर मग या भन्नाट किचन जुगाडबाबत जाणून घ्या.

पहा गव्हाच्या पीठाची कमाल

तुम्हाला विश्वास बसणार नाही ही तांबे-पितळीची भांडी घासण्याची पावडर तयार करण्याचा आपण गव्हाचे पीठ वापरणार आहोत. गव्हाचे पीठापासून तयार केलेल्या पावडरने तांबे-पितळीची भांडी कशी निघतात जाणून घेऊ या

Ants in a box of rice
Kitchen Hacks: तांदळाच्या डब्याला मुंग्या लागल्यात? ‘हे’ सोप्पे उपाय मुंग्यांना पळवून लावतील
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
devmanus marathi movie annoucement
‘देवमाणूस’ चित्रपटात झळकणार महेश मांजरेकर आणि रेणुका शहाणे यांची जोडी, सोबतीला दिसणार सुबोध भावे; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
Boy set fire to Akash Kandil
VIDEO: “ही कार्टी काय करतील त्याचा नेम नाही” खेळता खेळता चक्क कंदिल पेटवला; पुढे जे घडलं ते पाहून पोट धरुन हसाल
Lays Paneer Bites Recipe in marathi easy paneer recipe
१० रुपयांच्या चिप्सपासून बनवा पनीरचा ‘हा’ खास पदार्थ, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी ठरेल बेस्ट! लगेच वाचा रेसिपी
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स

गव्हाच्या पीठापासून बनवा तांबे-पितळीची भांडी घासण्याची पावडर

प्रथम एका वाटीत गव्हाचे पीठ घ्यावे त्यात दोन चमचे मीठ टाका. त्यात खाण्याचा सोडा टाका, त्यात लिंबू सत्व (सायट्रेक अॅसिड) २ चमचे टाका. कोरडे मिश्रण हवे असेल तर लिंबू सत्व वापरा अन्यथा लिंबू पिळून टाकू शकता. आता त्यात हवे असेल तर त्या थोडासा लाल रंग टाकू शकता. सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात टाकून फिरवून घ्यावे आणि त्यात २ चमचे वॉशिंग पावडर टाकावी चमच्याने एकत्र करून घ्या. तांब्याची भांडी घासण्यासाठी ही पावडर वापरा.

येथे पाहा किचन जुगाड व्हिडीओ

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तांब्याची भांडी साफ करण्यासाठी एक महिलेने ही गव्हापासून ही पावडर तयार कशी केली हे दाखवले आहे. आणि या पावडरने हे भांडे घासल्यानंतर तांब्यांची भाडी चकचकीत झाल्याचे दिसते आहे. भांडी घासण्यासाठी हा जुगाड तुमच्या नक्कीच उपयोगी ठरले.

Story img Loader