How To Find Adulteration in Oil Video: अन्न आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ ही एक सामान्य समस्या आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या समस्येमुळे अन्नातून विषबाधा होण्याचा धोका अधिक असतो. भाज्या खराब असतील तर एकवेळ धुवून घेता येतात पण तेल, तूप अशा वस्तूंमधील भेसळ चटकन डोळ्याला दिसतही नाही आणि सर्वाधिक गंभीर परिणाम करू शकते. आज आपण भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने तेलाची भेसळ कशी ओळखावी याविषयी दिलेली सविस्तर माहिती जाणून घेऊया ..
तेलाची भेसळ ओळखण्यासाठी वापरला FSSAI ने वापरलेला मेटॅनिल हा पिवळा रंग आहे, जो सामान्यतः पीएच निर्देशक म्हणून वापरला जातो. परवानगी नसलेला हा फूड डाय , तो भारतात हळद पावडर, तूरडाळ, चणाडाळ, पिवळे वाटाणे, आणि अगदी तेल यांसारख्या किराणा वस्तूंमध्ये वापरला जातो.
डॉ. अजय नायर, नारायणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, जयपूर यांनी सांगितले की, “भेसळयुक्त तेलांमुळे आरोग्य, पर्यावरण आणि ग्राहकांच्या विश्वासाला धोका निर्माण होतो. अशा फसवणुकीला शोधण्यासाठी तेलाचा रंग, गंध आणि चव नीट बारकाईने अभ्यासली पाहिजे. शुद्ध तेल साधारणपणे पारदर्शक असतात. कोणतीही असामान्य किंवा अयोग्य वैशिष्ट्ये भेसळ दर्शवू शकतात.”
घरगुती पद्धतीने तेलातील भेसळ कशी ओळखाल?
नोंदणीकृत आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी सांगितले की, “मेटॅनिल येलो हा भारतात मोठ्या प्रमाणावर विनापरवानगी वापरला जाणारा खाद्य रंग आहे आणि मानवी वापरासाठी योग्य नाही.” तेल भेसळीचा आणखी एक प्रकार म्हणजे ट्राय-ऑर्थो-क्रेसिल-फॉस्फेट (TOCP). “हा ऑर्गनोफॉस्फरस पदार्थ आहे जो विषबाधा करू शकतो. तेलाची परीक्षा करण्यासाठी, एका भांड्यात २ मिली तेल घ्या आणि त्यात एक चमचा पिवळे लोणी घाला. जर तेलाचा रंग बदलला नाही तर ते तेल शुद्ध आणि वापरासाठी सुरक्षित आहे. जर रंग लाल झाला, तर ते तेल अशुद्ध आहे आणि मानवी वापरासाठी धोकादायक आहे.”
खोबरेल तेलातील भेसळ कशी ओळखावी?
काही वेळा खोबरेल तेलात इतर तेल मिसळले जाते. “तुम्हाला नारळाच्या तेलात इतर तेल मिसळले आहे का हे शोधायचे असल्यास, एका पारदर्शक ग्लासमध्ये खोबरेल तेल घ्या आणि हा ग्लास सुमारे 30 मिनिटे रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. रेफ्रिजरेशनमुळे नारळाचे तेल घट्ट होईल, परंतु इतर तेलांचे प्रकार स्वतंत्र थर म्हणून राहतील.”
भेसळ शोधण्यासाठी FSSAI ने ट्विटरवर एक साधी 5-स्टेप चाचणी सांगितली आहे.
- टेस्ट ट्यूबमध्ये 1 मिली तेलाचा नमुना घ्या.
- त्यात 4 मिली डिस्टिल्ड वॉटर घाला.
- टेस्ट ट्यूब हलवा.
- हे मिश्रण 2 मिली दुसऱ्या टेस्ट ट्यूबमध्ये घ्या
- मिश्रणात 2 मिली सांद्रित (कॉन्सन्ट्रेटेड) एचसीएल घाला.
हे ही वाचा<< अर्ध्या बटाट्याने बाईक, कार, स्कुटीचा ‘हा’ मोठा प्रश्न सोडवा; पावसात फिरताना पैसे व जीव वाचवू शकता, पाहा Video
*भेसळ विरहित तेलाच्या वरच्या थरात रंग बदलला जाणार नाही.
*भेसळ असल्यास, तेलाच्या वरच्या थराचा रंग लाल होतो.